Pune Rainfall: ताम्हिणी घाटात १९० मिलिमीटर पाऊस

Monsoon 2025: जिल्ह्याच्या पश्चिम भागात पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. तर घाटमाथ्यावर मुसळधार कोसळत आहे.
Tamhini Ghat Rainfall
Tamhini Ghat RainfallAgrowon
Published on
Updated on

Pune News: जिल्ह्याच्या पश्चिम भागात पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. तर घाटमाथ्यावर मुसळधार कोसळत आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक १९० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. प्रामुख्याने धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्यामुळे धरणांतून विसर्ग वाढविण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी दुपारनंतर पाऊस सुरू झाला. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहिला आहे. ताम्हिणीनंतर डुंगरवाडी घाटमाथ्यावर १३५ मिलिमीटर, दावडी १२५, पोपळी १२४, आंबोणे ११५, शिरगाव ११२, भिरा ९४, लोणावळा ९०, खोपोली ६८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

Tamhini Ghat Rainfall
Tamhini Ghat Rain: ताम्हिणीत ३७० मिलिमीटर पाऊस

तर वानगाव, कोयना, धारावी, शिरोटा, कुंडली, भिवपुरी, खांड या घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. तर मुळशी धरणक्षेत्रात ११२ मिलिमीटर पाऊस पडला असून मुठा आणि नीरा खोऱ्यातील धरणक्षेत्रात जोर अधिक होता. तर कुकडी धरणक्षेत्रात तुरळक सरी पडल्या.

धरणक्षेत्र व घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे मागील चोवीस तासांमध्ये २.६७ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण असलेल्या २६ धरणांत जवळपास १५४ टीएमसी म्हणजेच ७७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

Tamhini Ghat Rainfall
Karul Ghat Landslide: करूळ घाटात दरड कोसळली

तर टेमघर, पानशेत, पवना, कासारसाई, चासकमान, वडीवळे, भाटघर, वीर, येडगाव, डिंभे, चिल्हेवाडी, घोड, उजनी या धरणात ७५ टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. विसापूर, नाझरे, आंध्रा ही धरणे शंभर टक्के भरली असून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. 

मंगळवारी (ता.१५) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये : मुळशी ११२, टेमघर ३६, वरसगाव २०, पानशेत २१, खडकवासला ३, पवना ५५, कासारसाई १५, कळमोडी १०, चासकमान, माणिकडोह, चिल्हेवाडी ६, भामा आसखेड ११, आंध्रा १५, वडीवळे ३१, गुंजवणी २५, भाटघर, पिंपळगाव जोगे ५, नीरा देवघर २३, डिंभे ४, येडगाव २.

धरणांतून विसर्ग सुरू

सध्या खडकवासलातून ६०६, पवना १८००, कासारसाई २०४, कळमोडी ५०१, चासकमान ४००, आंध्रा २३१, वडीवळे २१०३, नाझरे २८१, गुंजवणी २५०, वीर १८९९, येडगाव १३००, वडज २३०, चिल्हेवाडी ६३९, घोड १००, विसापूर ४०, उजनी ९३६० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नीरा, कुकडी, मीना, घोड, हंगा, भीमा, मुठा, पवना, आरळा, इंद्रायणी, कऱ्हा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com