Nashik Rainfall : नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला

Rain Update : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर गेल्या सप्ताहात दिसून आला. त्यामुळे धरणातून मोठा विसर्ग सुरू होता. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, नाशिक व दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर होता.
Heavy Rain
Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जुलै महिन्यात दररोज कोसळणाऱ्या संत धार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. यासह शेती कामकाजावर देखील परिणाम झाला. मात्र, मंगळवार तारीख आठ पासून पावसाने काही उसंत घेतली असून पावसाचा जोर कमी झाल्याचे काहीसा दिलासा मिळाला आहे. बुधवार (ता. ९) रोजी जिल्ह्यात सरासरी ३ मिमी पावसाची नोंद झाली.

जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर गेल्या सप्ताहात दिसून आला. त्यामुळे धरणातून मोठा विसर्ग सुरू होता. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, नाशिक व दिंडोरी तालुक्यात पावसाचा जोर होता. काही भागात अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. मात्र आता पावसाने उघडीप दिली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी झाला.

Heavy Rain
Nashik Rain: जूनमध्ये गोदावरी दुसऱ्यांदा खळाळली

यापूर्वी गंगापूर धरणातून विसर्ग टप्प्याट्याने वाढविण्यात आल्याने नाशिक शहरातील गोदाघाट परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. तर गोदाकाठ परिसरातील चांदोरी येथील मंदिरे पाण्याखाली गेली होती; मात्र आता विसर्ग कमी करण्यात आल्याने पाणी ओसरले.आहे.गंगापूर धरणांमधून विसर्ग सुरूच असला तरी गोदाघाटावरील पूरस्थिती आटोक्यात आली आहे. मंगळवारी(ता. ८) रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झाल्या.

यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि त्र्यंबकेश्वर भागात पावसाचा जोर कमी झाल्याने गंगापूर विसर्ग कमी झाला आहे. इगतपुरी, पेठ, सुरगाणा तालुक्यांत पावसाचा जोर मंदावलेला असून, इतर तालुक्यांतही पावसाचे प्रमाण मध्यम राहिले.

Heavy Rain
Nashik Heavy Rain: मुसळधारेने गोदावरीला पूर

दारणा आणि पालखेड धरणांमध्ये पाण्याची आवक कमी झाल्याने त्यातील विसर्गात कपात करण्यात आली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने जिल्ह्यात जोर धरलेला होता. गेल्या ९ दिवसांत जिल्ह्यात सरासरी ९२ मिमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. मात्र मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा, निफाड, येवला, सिन्नर, चांदवड नांदगाव आणि देवळा हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी ओलांडली आहे.

धरणांमधून होणारा विसर्ग

धरण विसर्ग(क्युसेक्स)

दारणा ३५३०

गंगापूर २२०५

पालखेड ६९६

पुणेगाव ५५०

भोजापूर ५३९

भावली ४८१

भाम १२४५

वाकी बंद

वालदेवी ५९९

आळंदी २४३

कश्यपी १०००

मुकणे बंद

कडवा ८०४

करंजवन ९४५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com