Kolhapur Flood agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : राधानगरी, शाहुवाडी, गगनबावड्यात अतिवृष्टी, पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर इशारा पातळीकडे वाटचाल

Heavy rains kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली गेले, तर, कसबा बावडा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३५ फूट २ इंचापर्यंत गेली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या २४ तासांत मुसळधार पावसाने चांगलाच जोर धरला आहे. राधानगरी, शाहुवाडी, गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे, पंचगंगा नदीचे पाणी काल (ता.१९) सायंकाळी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आले. रात्री नऊ वाजता जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली गेले, तर, कसबा बावडा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३५ फूट २ इंचापर्यंत गेली आहे.

राधानगरी धरणातून सध्या १ हजार ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर, आलमट्टी धरणातून सुरु असलेला ६५ हजार क्युसेक पाण्याचा विर्सग वाढवून ८० हजारहून अधिक क्युसेक करावा, अशी मागणी पाटबंधारे विभागाने केली आहे. झालेल्या पावसाने पंचगंगा नदी इशारा पातळीकडे वाटचाल करू लागली आहे. राजाराम बंधाऱ्यावरील इशारा पातळी ३९ तर धोका पातळी ४३ फुटांवर आहे.

राधानगरी धरणासह काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. राधानगरी धरण ७० टक्के तर काळम्मावाडी धरण ५२ टक्के भरले आहे. कोल्हापूरातील पावसाचा विचार करता, आलमट्टीतील पाण्याचा विसर्ग ९० हजार क्युसेकपर्यंत वाढवा लागणार आहे. विसर्ग वाढवल्यास जिल्ह्यावर येणारा महापुराचा धोका टळू शकतो.

याबाबत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने म्हणाले की, आलमट्टी धरणातील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे भविष्यात पूरस्थिती निर्माण होवू नये यासाठी आणि सद्याच्या पावसाचा विचार करता आलमट्टी धरणातून ८० हजारहून अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग करावा, अशी मागणी केली आहे.

कृष्णा प्रथमच पात्राबाहेर

शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. हंगामात प्रथमच पाणी पात्राबाहेर पडले आहे. गुरुवारी रात्रीपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत तब्बल सात फुटाची वाढ झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील राजापूर बंधाऱ्यातून ५४ हजार क्युसेक्सने पाणी कर्नाटकात सोडले जात आहे.

झापाचीवाडी लघूपाटबंधारे प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

झापाचीवाडी (ता. राधानगरी) येथील लघुपाटबंधारे प्रकल्प तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला असून, अतिरिक्त पाणी सांडव्यातून बाहेर जात आहे. त्यामुळे धामणी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. या प्रकल्पाची ९९० सहस्त्र घनमीटर पाणी साठवण क्षमता आहे.

यवलूज-पोर्ले बंधारा पाण्याखाली

आसुर्ल-पोर्ले परिसरात कासारी नदीचे पाणी पात्रा बाहेर पडले असून, पोर्ले माजगाव रस्ता सायंकाळपर्यंत बंद होण्याची शक्यता आहे. यवलूज पोर्ले बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे निटवडे, यवलुज,पडवळ गावात जाण्यासाठी पोर्ले माजगाव पुलावरुन वाहतूक सुरू होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT