Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पिकांना पोषक पाऊस; २४ तास मुसळधार, हवामान विभागाचा अंदाज

Heavy Rain Imd Alert : हवामान विभागाच्या माहितीनुसार आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे.
Kolhapur Rain
Kolhapur Rainagrowon
Published on
Updated on

Kolhapur Rain Alert : मागच्या वर्षी पावसाने दडी मारल्याने यंदा बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत होता दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पावसाने समाधानकारक सुरूवात केली आहे. मे महिन्यातील वळीव पाऊस जून महिन्यात झालेला सरासरीपेक्षा जास्त पावसानंतर जुलै महिन्यातील मुसळधारेने कोल्हापूर जिल्ह्यातील पीके चांगलीच जोर धरू लागली आहेत. भूईमूग, सोयाबीन, भात लावणीसह नाचणीची पिकांना पोषक वातावरण राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज पावसाचा ऑरेंज अलर्ट तर उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात मात्र शेतकऱ्यांवर पावसाची प्रतीक्षा करण्याची वेळ आली होती. पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अनियमित पावसाने पिके अडचणीत आली होती. या तालुक्यातही दोन दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी दिलासा मिळाला आहे. पिके तरतरीत झाली आहेत.

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, गेल्या २४ तासांत ४२.४ मिमी पाऊस पडला. गगनबावडा तालुक्यात ९६.९ मिमी पाऊस पडला. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, काल (ता.१८) रात्री ८ वाजता पाणी पातळी २५ फूट ११ इंच इतकी होती. पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

आजरा-चंदगड मार्गावर जेऊर घाटात दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती. रस्त्यात मोठाले दगड व झाडे खाली आल्यामुळे वाहतुकीला अडथळा तयार झाला होता. प्रशासनाने तातडीने यंत्रणा कार्यरत केल्याने काही तासात हा मार्ग वहातुकीसाठी खुला केला आहे.

कासारकांडगाव मार्ग हा चंदगडकडे जाणार जवळचा मार्ग आहे. या मार्गावर रहदारी मोठी आहे. या मार्गवर जेऊरचा घाट लागतो. दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरड कोसळत असते. गेले दोन दिवस तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने बुधवारी रात्री दरड कोसळली.

Kolhapur Rain
Kolhapur Sangli Heavy Flood : महापुराचा धोका कायम? केंद्रीय जल आयोगाच्या निकषांकडे दूर्लक्ष; दिलासा मिळणार कधी?

जंगमहट्टी प्रकल्प शंभर टक्के भरला

चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी मध्यम प्रकल्प काल (दि.१९) रात्री आठच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरला. प्रकल्प पूर्ण भरल्याने सांडव्यावरून नदीपात्रात येणारे पाणी आणि या भागातील संततधार पाऊस यामुळे ताम्रपर्णीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना पाटबंधारे खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कासारी धरण ७० टक्के भरले

शाहूवाडी तालुक्यातील काही गावांना व पन्हाळा तालुक्याला सुजलाम्‌ सुफलाम्‌ करणाऱ्या कासारी (गेळवडे) या मध्यम प्रकल्प ७०.४९ टक्के भरला असून सध्‍या धरणांत १.९६ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील २४ तासांत पाऊस : १५५ मी.मी. पडला आहे. तर १ जूनपासून एकूण पाऊस: १९६१मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com