Rain Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Alert : नांदेड जिल्ह्यातील पाच मंडलांत अतिवृष्टी

Rain Update : नांदेड जिल्ह्यात बुधवारी (ता. ३१) नांदेड, कंधार, अर्धापूर, लोहा, उमरी, धर्माबाद, भोकर व मुदखेड तालुक्यांत जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात बुधवारी (ता. ३१) नांदेड, कंधार, अर्धापूर, लोहा, उमरी, धर्माबाद, भोकर व मुदखेड तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील कंधारमधील दोन, तर लोहा तालुक्यातील तीन अशा पाच मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी २२.४० मिलिमीटर पाऊस झाला आहे. एक जून ते आजपर्यंत नांदेडमध्ये ४७८.९० मिलिमीटरनुसार ११७.४६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ५३.७३ टक्के नोंदल्याची माहिती मिळाली.

जिल्ह्यात मागील महिन्यातील सात तारखेपासून सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे खरिपातील आंतरमशागतीची कामे ठप्प झाली आहेत. संततधार पावसामुळे पिकांची वाढही खुंटली आहे. शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडली आहेत.

मागील दोन दिवसांपूर्वी काहीसा मंदावलेल्या पावसाने बुधवारी जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील चार मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. बुधवारी झालेला पाऊस कंधार, लोहा, उमरी, धर्माबाद, भोकर, नांदेड तालुक्यांत सर्वाधिक होता. यामुळे कंधार व लोहा तालुक्यांतील पाच मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी २२.४० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

अतिवृष्टी झालेली मंडले

लोहा ९९, सोनखेड ९९, माळाकोळी ६९, कंधार ६७, फुलवळ ६७.८०.

तालुकानिहाय झालेला पाऊस

नांदेड ३०.३०, बिलोली १२, मुखेड - एक, कंधार ३४.७०, लोहा ७१.२०, हदगाव ९, भोकर ३५.५०, देगलूर ०.५०, किनवट ८.४०, मुदखेड २४.६०, माहूर २.७०, धर्माबाद ४१, उमरी ४४, अर्धापूर ३८, नायगाव २६. सरासरी २२.४० मिलिमीटर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nilanga Crop Competition Winners: निलंग्यात पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार

Farm Loan Waiver Benefits: पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

Nashik Annual Credit Plan: नाशिक जिल्ह्यासाठी ६० हजार ५७५ कोटींचा पतपुरवठा आराखडा मंजूर

Fruit Crop Insurance Scheme: फळपीक विमा योजनेच्या अर्जास प्रारंभ

NAFED Onion Procurement: कांदा खरेदीसाठी ‘नाफेड’ने जनजागृती करावी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

SCROLL FOR NEXT