Kharif Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Rain : सोलापूर जिल्ह्यात दमदार पावसाने खरिपाला जीवदान

Kharif Season : सोलापूर शहर व जिल्ह्यातून गायब झालेला पाऊस अखेर मंगळवारपासून (ता. २२) परतला आहे. मंगळवारी सायंकाळपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर शहर व जिल्ह्यातून गायब झालेला पाऊस अखेर मंगळवारपासून (ता. २२) परतला आहे. मंगळवारी सायंकाळपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सोलापूर शहर व परिसरात गेल्या २४ तासात ५४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात सरासरी १७.६ मिमी पावसाची आज नोंद झाली. या पावसामुळे चोहीकडे पाणी पाणी झाले आहे. आज दिवसभर सोलापुरात पावसाने अधून-मधून हजेरी लावल्याने आज दिवसभर पावसाळी वातावरण होते.

यावर्षी जूनपासून पावसाने दडी मारली होती. जुलैचा निम्मा महिना संपला तरीही मुसळधार पाऊस हजेरी लावत नसल्याने खरिपाची पिके धोक्यात येऊ लागली होती. पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने खरिपाच्या पिकांना मोठे जीवदान मिळाले आहे.

शुक्रवारपासून (ता. २५) श्रावण सुरू होत आहे. श्रावणाच्या अगोदर पावसाने दमदार हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे. मंगळवारी सकाळी ८.३० ते बुधवारी सकाळी ८.३० या चोवीस तासात ५४.४ मिमी पावसाची नोंद झाली. आज सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ५.० मिमी पावसाची नोंद झाली.

जुलैमधील सर्वाधिक पावसाचा दिवस

जुलै महिन्यात आतापर्यंतच्या २३ दिवसांमध्ये पावसाचे सरासरी दिवस ८ ठरले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक ८.६ मिलिमीटर सरासरी पाऊस मंगळवारी (ता. २२) नोंदविला गेला आहे. त्यानंतर सर्वाधिक १७.६ मिलिमीटर पावसाची नोंद बुधवारी (ता. २३) झाली आहे. जुलैमधील सर्वाधिक पावसाचा हा दिवस ठरला आहे. जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरी ९४.८ मिलिमीटर पाऊस होतो, आतापर्यंत ६१.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस

सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी करमाळा वगळता सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. उत्तर सोलापूर तालुक्यात ३९.७, दक्षिण सोलापूर तालुक्यात ३३.३, बार्शी तालुक्यात ३.३, अक्कलकोट तालुक्यात ४९.१, मोहोळ तालुक्यात २७.३, माढा तालुक्यात ३.८, पंढरपूर तालुक्यात १५, सांगोला तालुक्यात ७.३, माळशिरस तालुक्यात ५.२, मंगळवेढा तालुक्यात २७.६ असा एकूण जिल्ह्यात सरासरी १७.६ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT