
Parbhani News : खरीप हंगामात शुक्रवार (ता.११)पर्यंत परभणी जिल्ह्यात ४ लाख ५५ हजार ८३३ हेक्टर (८७.९१ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ४७ हजार ८०९ हेक्टरवर (८४.७४ टक्के) मिळून एकूण ८ लाख ३ हजार ६४२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. परभणी जिल्ह्यात कपाशीवर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात सरासरी ५ लाख १८ हजार ४६७ पैकी ४ लाख ५५हजार ८३३ हेक्टरवर (८७.९१टक्के) पेरणी झाली. त्यात कपाशीची १ लाख ९१ हजार ९५४ पैकी १ लाख ८१ हजार ५३ हेक्टर (९४.३२ टक्के) लागवड झाली आहे. सोयाबीनची २ लाख ५४ हजार ५४ पैकी २ लाख ३९ हजार २५८ हेक्टर (९२.९९टक्के) पेरणी झाली.
एकूण कडधान्याची ६६ हजार ६८१ पैकी ३४ हजार ४५२ हेक्टर पेरणी झाली त्यात तुरीची ४२ हजार ६०२ पैकी २८ हजार ५६७ हेक्टर, मुगाची १७ हजार ६०० पैकी ४ हजार ५५८हेक्टर, उडदाची ६ हजार ४१३पैकी १ हजार ३८३ हेक्टरवर पेरणी झाली. तृणधान्यांची ५ हजार ४४९ पैकी १हजार ६८ हेक्टर पेरणी झाली. त्यात ज्वारीची ३ हजार ८५७ पैकी ६०९ हेक्टर,बाजरीची ४९९ पैकी ६९ हेक्टर, मक्याची ३८७ हेक्टर पेरणी झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात सरासरी ४ लाख १० हजार ३९८ पैकी ३ लाख ४७ हजार ८०९ हेक्टरवर (८४.७४टक्के) पेरणी झाली. त्यात कपाशीची ३८ हजार ८२१ पैकी ३६ हजार ६३० हेक्टरवर (९४.३५ टक्के) लागवड झाली.सोयाबीनची २ लाख ५६ हजार ४०४ पैकी २ लाख ५० हजार ११३ हेक्टरवर (९७.५४ टक्के) पेरणी झाली.
एकूण कडधान्यांची ५८ हजार १६५ पेरणी झाली.त्यात तुरीची ५० हजार ५४८ हेक्टर,मुगाची ४ हजार २५२ हेक्टर ,उडदाची ३ हजार १५२ हेक्टर पेरणी झाली. तृणधान्यांची २ हजार ८३५ हेक्टर पेरणी झाली. त्यात ज्वारीची २ हजार ५६१ हेक्टर, बाजरीची १३ हेक्टर,मक्याची २३६ हेक्टरपेरणी झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.