Monsoon 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon 2025: पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर 

Rain Update: सलग तिसऱ्या महिन्यात पावसाचा जोर पाहायला मिळाला.तर मागील काही दिवसात पावसाचा जोर ओसरला होता. आता पुन्हा १० जुलै रोजी पावसाने उघडीप दिली होती. तर आता पावसाने पुन्हा जोर धरला आहे.

Team Agrowon

Nashik News: सलग तिसऱ्या महिन्यात पावसाचा जोर पाहायला मिळाला.तर मागील काही दिवसात पावसाचा जोर ओसरला होता. आता पुन्हा १० जुलै रोजी पावसाने उघडीप दिली होती. तर आता पावसाने पुन्हा जोर धरला आहे. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. यात इगतपुरी, पेठ व सुरगाणा तालुक्यात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

जुलै महिन्यात जिल्हाभर कोसळत आहे. मात्र मागील काही दिवसात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे दिसून आले.जुलै महिन्याचे जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान ३०८ मिमी आहे. तर आत्तापर्यंत ११९.६ मिमी पावसाची नोंद आहे.

१४ दिवसात सरासरी ३८.७ टक्के पाऊस झाला आहे. चालू महिन्यात इगतपुरी, सुरगाणा, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये या महिन्यातील सरासरीच्या अधिक पाऊस पडला आहे. इगतपुरी तालुक्यात गेल्या चार दिवसात पावसाचा जोर ओसरला होता.मात्र पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे.

तालुक्यातील इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, नांदगाव, टाकेद व धारगाव या सर्व महसूल मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. सुरगाणा तालुक्यातही उंबरठाणा, बाऱ्हे, बोरगाव, मनखेड, सुरगाणा, खोकरी या महसूल मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

पेठ तालुक्यातील पेठ, जोगमोडी, कोहोर, करंजाळी या महसूल मंडळांमध्ये दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस वाढला आहे.कळवण तालुक्यातही दळवट, मोकभणगी परिसरात पावसाचा जोर होता.निफाड तालुक्यात रानवड,पालखेड परिसरात पाऊस आहे.नाशिक,त्र्यंबकेश्वर, देवळा तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावली. तर दिंडोरी, सिन्नर, येवला, चांदवड या तालुक्यात हलक्या ते मध्यम सरी झाल्याची नोंद आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT