Monsoon 2025: उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्यात १ जुलै रोजी कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Monsoon 2025
Monsoon 2025Agrowon
Published on
Updated on

Pune News: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात आज (ता. १) पावसाचा तुरळक ठिकाणी जोर कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाची, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या घाटाकडील भाग आणि विदर्भात पावसाच्या सरी मागून सरी येत आहेत. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जेऊर येथे राज्यातील उच्चांकी ३३.५ अंश तापमानाची नोंद झाली. राज्याच्या अंतर्गत भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

आज (ता. १) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज असल्याने, तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

Monsoon 2025
Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता 

कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येणार

पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावरील कमी दाब क्षेत्र या भागात कायम आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली उत्तर ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडकडे येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगरपासून सिरसा, आग्रा, प्रयागराज, दाल्दोंगज, बंकुरा, कमी दाबाचे केंद्र ते आग्येय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांपासून कमी दाब क्षेत्रापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत.

सोमवारी (ता. ३०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---२८.५---२२.४

अहिल्यानगर---३०.२---२२.५

‎‎धुळे---३०.०---२०.६

जळगाव---३१.०---२२.०

जेऊर---३३.५---२०.०

‎‎कोल्हापूर---२६.९---२२.५

‎महाबळेश्वर---१९.५---१७.८

Monsoon 2025
Monsoon 2025 : मॉन्सूनने देश व्यापला

मालेगाव---२९.२---२१.२

‎‎नाशिक---२७.१---२२.९

‎निफाड---२८.५---२२.९

‎सांगली---२८.५---२२.४

‎सातारा---२७.२---२२.०

‎सोलापूर---३२.०---२४.०

‎सांताक्रूझ---३१.७---२७.४

डहाणू---३२.०---२५.४

‎रत्नागिरी---३०.८---२४.७

‎छत्रपती संभाजीनगर---२८.६---२३.२

‎धाराशिव---३२.०---२१.१

‎परभणी---३१.९---२४.०

परभणी (कृषी)---३२.४---२३.१

‎‎अकोला---२९.०---२३.४

अमरावती---२७.२---२०.३

‎भंडारा---२५.०---२१.०‎‎

बुलडाणा---२७.४---२१.०

‎ब्रह्मपुरी---२६.२---२२.०

‎चंद्रपूर---२७.४---२१.८

‎गडचिरोली---२८.०---२३.०

‎गोंदिया---२६.१---२२.२

‎नागपूर---२८.२---२२.८

‎वर्धा---२८.०---२२.६

‎वाशीम---२८.६---२१.२

‎यवतमाळ---२६.४---२१.०

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, अमरावती, नागपूर, भंडारा.

विजांसह पावसाचा अंदाज (येलो अलर्ट) :

धूळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com