Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Rain : खानदेशात पावसाचा धुमाकूळ

Rain Update : खानदेशात मागील चार दिवसांत अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील चार दिवसांत अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला आहे. काही भागांत अतिवृष्टीही मागील तीन दिवसांत झाली आहे. पावसामुळे अनेक नद्यांना प्रवाही पाणी आले आहे. तसेच काही प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला आहे. धुळ्यात शिरपुरातील अनेर धरणातून पुन्हा जलसाठा नियंत्रणासाठी पाणी सोडण्यात आले आहे.

धुळ्यात शिंदखेडा तालुक्यातील सवाई मुकटी येथे कासाई नदीला महापूर आला. यात सवाई मुकटी गावातील महादेव मंदिरास पाण्याचा वेढा पडला. तर नदीकाठच्या सुमारे १० ते १२ घरांत पाणी शिरले. सवाई मुकटी व तामधरे भागात अतिजोरदार पाऊस शुक्रवारी (ता. २३) दुपारी झाला. यामुळे कासाई नदीला पूर आला. अतिपावसाने परिसरातील २१ घरांची पडझड झाली आहे. जोरदार पावसाने पिकांची स्थितीही खानदेशात पुन्हा नाजूक बनली आहे.

खानदेशात मध्यंतरी १० दिवस पाऊस नव्हता. या काळातही काही भागात मध्यम ते तुरळक पाऊस झाला. परंतु मागील तीन, चार दिवसांपासून सर्वत्र पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील सात महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. त्यात जळगावातील नशिराबाद, भुसावळ, भुसावळातील कुऱ्हे, यावल, चोपड्यातील गोरगावले, चाळीसगाव, चाळीसगावातील मेहुणबारे, खडकी या भागात अतिवृष्टी झाली आहे.

नशिराबाद मंडळात सर्वाधिक ८७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात धरणगाव, पाचोरा व एरंडोल हे तालुके वगळता सर्वत्र १०० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. सातपुडा पर्वतालगतच्या गावांत अधिकचा पाऊस झाला आहे. त्यात यावल, भुसावळ, चोपडा, धुळ्यातील शिरपूर या भागात अधिकचा पाऊस गुरुवारी (ता. २२) व शुक्रवारी झाला आहे.

शेतांत पाणीच पाणी

वाफसा जेमतेम होत असतानाच पावसाचा धुमाकूळ सुरू झाल्याने खानदेशातील विविध नद्या, प्रकल्पांच्या क्षेत्रातील काळ्या कसदार जमिनीत वाफसा नाहीसा झाला आहे. सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. यामुळे पिके हातची जातील, अशी स्थिती आहे. उडीद, मूग पिकांत शेंगा पक्व झाल्या आहेत. पण पावसाने उडीद, मूग पिकांची हानी होत आहे.

तसेच पूर्वहंगामी कापूस पिकातही पावसाने खालच्या भागातील कैऱ्यांचे माती, पाण्याने नुकसान होत आहे. पीक लालसरही पडत आहे. अतिपावसाच्या नुकसानीबाबत धुळे, जळगाव भागात पंचनामे सुरू झाले आहेत. घरांची पडझड, माती वाहून जाणे, शेतातील नुकसान याबाबत नुकसानीची माहिती संकलित केली जात आहे. याबाबतचा अहवाल तयार करून प्रशासन वरिष्ठ कार्यालयास सादर करणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT