Crop Damage
Crop DamageAgrowon

Rain Impact : पावसाअभावी पिके टाकू लागली माना

Crop Issue : तुळजापूर तालुक्यातील अनेक भागात पावसाने दीर्घकालीन उघडीप दिली आहे. त्यामुळे सोयाबीन, उडीद यासह इतर विविध पिके सध्या कोमजत असून माना टाकू लागली आहेत.
Published on

Tuljapur News : तुळजापूर तालुक्यातील अनेक भागात पावसाने दीर्घकालीन उघडीप दिली आहे. त्यामुळे सोयाबीन, उडीद यासह इतर विविध पिके सध्या कोमजत असून माना टाकू लागली आहेत. त्यामुळे आता तुळजापूर तालुक्याला चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.

यंदा तालुक्यात वेळेवर पेरण्या झाल्या आहेत. सध्या अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच उडीद पिके फुलांमध्ये अथवा शेंगामध्ये आहेत. उडीद पिकाचे आयुष्यच केवळ साडेतीन महिने असते. पेरणीपासून ते काढणीपर्यंत उडीद पिक साडेतीन महिन्यांमध्ये निघते. तथापी सध्या पाऊस नसल्यामुळे पिकांची चांगली वाढ होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Crop Damage
Crop Damage : सततच्या पावसाने पिकांचे नुकसान होण्याची चिन्हे

साधारणपणे तालुक्यात ८७ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र आहे. साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रात उडीद आहे. शेतकऱ्यांच्या पिकाची सध्या वाढ होत नसल्यामुळे अडचणीचे दिवस आहेत. काही शेतकरी यापूर्वी झालेला पाऊस चांगल्या प्रकारे झाला होता.

Crop Damage
Weather Impact : पावसाचा उडीद, मुग पिकास फटका

मात्र, त्यानंतर पावसाने दिलेली उघडीप यामुळे शेतकऱ्यांची खरीपाची पिके अडचणीत आली आहेत. सध्या दुपारी बारा ते तीन या कालावधीत पिके सुकत आहेत. शेतकऱ्यांना सर्वच ठिकाणी सोयाबीन पिकला पाणी देण्यासारखी परिस्थिती नाही. ग्रामीण भागात शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

सध्या सोयाबीन, उडीदाची अवस्था बिकट आहे. मंगरूळ (ता. तुळजापूर) भागातील सोयाबीन, उडीद या पिकांची अवस्था पाऊस नसल्यामुळे बिकट झाली आहे. आमच्या भागात सर्वसाधारणपणे पंधरा ते वीस दिवस पाऊस झाला नाही.
नागेश डोंगरे, शेतकरी, मंगरूळ.
आमच्या भागातील पिके पावसाअभावी सुकत आहेत. दुपारी बारा ते तीन या वेळेत जास्त ऊन असते. यावेळी पिके सुकल्यासारखी दिसत असून माना टाकत आहेत.
सौदागर जाधव, शेतकरी, मंगरूळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com