Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा पुन्हा धुमाकूळ

Heavy Rainfall : पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून भंडारदरा, भाटघर, खडकवासला या धरणांतून पाण्याचा विसर्ग नदीला सोडण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर नदीपात्रात कोणीही उतरू नये, असा इशारा देण्यात आला आहे.
Rain Forecast
Rain ForecastAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या अनेक भागांत पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत सिंधुदुर्गमधील कुडाळ येथे १९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून भंडारदरा, भाटघर, खडकवासला या धरणांतून पाण्याचा विसर्ग नदीला सोडण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर नदीपात्रात कोणीही उतरू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात अतिवृष्टीसदृश पाऊस

गेल्या काही दिवसांनंतर पुन्हा कोकणात जोरदार पाऊस झाला आहे. प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. रत्नागिरीतील दापोली, फणसवणे, तेर्ये, पुनस, विलवडे, ओणी, कडवी, मुरूड येथे ९८ मिलिमीटर, तर तुळसानी ९५, पाचल येथे ९३ मिलिमीटर, तर सिंधुदुर्गातील कणकवली, सांगवे येथे ९५ मिलिमीटर, पालघरमधील मांडवी, निर्मल, माणिकपूर येथे ५९ मिलिमीटर, ठाण्यातील खर्डी येथे ५० मिलिमीटर पाऊस झाला.

भातपिकाला दिलासा

या पावसामुळे भातपिकांना दिलासा मिळाला असून पिकांची वाढ चांगली आहे. मुसळधार पावसामुळे भात खाचरे भरून वाहू लागल्याने ओढे, नाले भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरले होते. वाशिष्टी, जगबुडी, अंबा, कुंडलिका, उल्हास या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून भातसा, वैतरणा, बारावे, मोराबे, हेटवणे, तिलारी, अर्जुना, गडनदी, देवघर, धामणी अशा प्रमुख धरणांतील पाणीपातळी ९० टक्क्यांहून अधिक झाली आहे. तर मुंबई महानगरपालिका अंतर्गत असलेली मोडक सागर, तानसा, विहार, तुलसी, मध्य वैतरणा ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.

Rain Forecast
Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढला

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम

घाटमाथ्यावर अनेक दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. कोयना, भिरा या घाटमाथ्यावर ६७ मिलिमीटर पाऊस पडला असून ताम्हिणी, डुंगरवाडी, अंबोणे, शिरगाव, ठाकूरवाडी या घाटमाथ्यांवर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्रात नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. वैतरणा धरणक्षेत्रात सर्वाधिक १३४ मिलिमीटर पाऊस झाला. तर नगर जिल्ह्यात शनिवारीही सकाळपासून ढगाळ वातावरणासह अनेक भागात संततधार सुरू होती.

प्रशासनाकडे झालेल्या नोंदीनुसार २३ मंडलांत अतिवृष्टी, तर ५० पेक्षा अधिक मंडलांत जोरदार पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे भंडारदरा, निळवंडेतून बंद केलेला विसर्ग पुन्हा सुरू केला आहे. जामखेडमधील खैरी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला, सीनातही वेगाने पाणी जमा होत होते. पुणे जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे भाटघर धरणांतून शनिवारी दुपारी सव्वा वाजता २२ हजार ६३१ क्युसेक, वरसगावमधून दुपारी दोन चार हजार २६२ क्युसेक, तर खडकवासलातून दुपारी चार वाजता १९ हजार ११८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीला सोडण्यात आला होता.

साताऱ्यातील उंडाळे, शिरवळ येथे ६७ मिलिमीटर, तर महाबळेश्‍वर ५२, लामज येथे ६० मिलिमीटर, सांगलीतील भोसे, मनेराजुरी येथे ५४ मिलिमीटर, तांदूळवाडी ५२, तासगाव ७१, कोकरूड ६०, चरण येथे ६७ मिलिमीटर, कोल्हापुरातील मलकापूर येथे ८५ मिलिमीटर, तर कडगाव ६९, गवसे ६४, वाडी-रत्नागिरीत ५७ मिलिमीटर पाऊस झाला. नाशिकमध्येही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धुळेतील शिरूड, नेर येथे ५४ मिलिमीटर, नंदूरबारमधील खापर येथे ६० मिलिमीटर, मोरांबा ५० मिलिमीटर, जळगावमधील शिरूड येथे ५८ मिलिमीटर, रिंगणगाव ५० मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे पिकांना दिलासा मिळत आहे.

मराठवाड्यात कमी-अधिक पाऊस

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम सरी कोसळल्या. मागील काही दिवसांपासून मराठवाड्याच्या अनेक भागांत कमी-अधिक पाऊस पडत आहे. बीड जिल्ह्यातील ११ मंडलांत अतिवृष्टी झाली. परळी वैजनाथ तालुक्यातील पांगरी येथील वाण नदीवरील तात्पुरत्या स्वरूपाचा तयार करण्यात आलेला पूल वाहून गेल्याने परळी-महामार्ग बंद झाल्याने वाहतूक खोळंबली आहे.

तर परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ९ मंडलांत अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील केकरजवळा मंडलात ७५, रामपुरी ८८.३, बाभळगाव ६९.३, सोनपेठ ८०.३, शेळगाव ६६, वडगाव ७२, महातपुरी ८५, हिंगोलीतील वसमत मंडलांत ७०.५, टेंभुर्णी ७०.३ मिलिमीटर अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांना नुकसान होण्याची भीती आहे. छत्रपती संभाजीनगरमधील गेवराई मर्दा येथील पाझर तलाव फुटला आहे. नांदेड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ओढे, नाले चांगलेच प्रवाही झाले आहेत. लातूरमधील हडोळती येथे ६२ मिलिमीटर, जळकोट ६१, धाराशिवमधील तेरखेडा येथे ५२ मिलिमीटर, तर कळंब ७४, इतकर ८०, डाळिंब येथे ६३ मिलिमीटर पाऊस झाला.

Rain Forecast
Rain Alert : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा मंडलांत अतिवृष्टी

विदर्भात हलक्या ते मध्यम सरी

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. यामध्ये यवतमाळमधील मांगकिन्ही येथे ७४ मिलिमीटर, तर लोनबेहल, अंजनखेड ६५, सावळी ५०, मोझर ५९, हिवरा ६०, शिरोली, घोटी येथे ५३ मिलिमीटर, बुलडाण्यातील सिंदखेड येथे ५६ मिलिमीटर, शेगाव ६८, अकोल्यातील हिवरखेड येथे ५९ मिलिमीटर, हातरुण ५५, आगर ५८ मिलिमीटर, वाशीममधील केकतउमरा येथे ६० मिलिमीटर, गिरोली ५६ मिलिमीटर अमरावतीतील शेंदुरर्जना, पुसाळा येथे ५१ मिलिमीटर, गडचिरोलीतील ब्राह्मणी येथे ५५ मिलिमीटर, मुलचेरा येथे ५३ मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे धरणांत अजूनही येवा सुरू आहे.

येथे पडला १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस
पडेल १६८, नंदगाव १०५, मार्गताम्हाणे १०९, बुरोंडी १२४, रत्नागिरी, फसोप १०४, खेडशी ११३, पावस ११८, पाली १२३, कोंडगाव १२६, देवळे १४५, राजापूर ११९, भांबेड १३६, नाटे १४५, जैतापूर १२५, साटवली ११८, देवगड १४६, मीठबाव १००, शिरगाव ११२, बापर्डे ११२, मालवण ११०, पेंडूर १६१, मसूरे १४७, श्रावण १७३, आबेरी १२३, पोइप १२६, सावंतवाडी, बांदा १०९, आबोली १४४, मडूरा १००, वेंगुर्ला ११८, वेतोरे १५५, कडावल, कसाल १७१, वालावल १३४, माणगाव १४०, पिंगुळी १७०, विक्रमगड १०१, नागापूर १०२, जेवूर १३०, माले, मुठे १०७, वांबोरी १०२

शनिवारी (ता.२४) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)


कोकण :
चरी ६०, चौक ५३, करंजवडी ५७, खारवली ५०, चानेरा ६३, वालवटी ५०, तळा ६१, मेंढा ५८, चिपळूण ५३, रामपूर ६१, वहाळ ७६, सावर्डे ५०, असुर्डे ५४, कळकवणे ५७, दाभोळ ७२, आंजर्ले ६५, वाकवली ८९, पालगड ७३, शिर्शी ७९, कुळवंडी ७०, भरणे ६९, दाभीळ ८२, गुहागर ७२, पाटपन्हाळे ६७, हेदवी ७७, मंडणगड ५१, जयगड ७६, कोतवडे ६७, मालगुंड ६३, तरवल ८१, मुरडव, माखजन ७५, फुंणगुस ६५, आंगवली ८५, देवरुख ८४, माभळ ६५, सौंदळ ८६, कोंडये ६६, कुंभवडे ७०, पाटगाव ८०, आचरा ७०, आजगाव ८१, शिरोडा ९०, म्हापण ८६, फोंडा, तळेरे ६६, नांदगाव ७२, वैभववाडी ८२, येडगाव ६५, तळकट ८७, भेडशी ६९

मध्य महाराष्ट्र : सुरगाणा ७७, मोहाडी ६६, टाकेद ६५, त्र्यंबकेश्वर ६६, वेळुंजे ५३, सावेडी ८३, केडगाव ५३, चिंचोडी पाटील ८४, चास ५१, पारनेर ५४, टाकळी ५४, कोळगाव ५७, जामखेड ७२, अरणगाव ५९, खर्डा ७९, नान्नज ७२, नायगाव ५०, शेवगाव ७१, बोधेगाव ६९, चापडगाव ५०, ढोरजळगाव ६१, पाथर्डी, माणिकदौंडी ७१, टाकळी ५१, कोरडगाव ८१, करंजी ९२, मिरी ६८, नेवासा खुर्द ६६, नेवासा बुद्रुक ५२, वडाळा ६६, ब्राह्मणी ७७, तळेगाव ६५, शेंडी ६५, कोपरगाव, रवांदे ८१, दहिगाव ६७, पोहेगाव ५९, शिर्डी ५१, नसरापूर, आंबवडे, निगुडघर, पानशेत, आंबवणे ५०, किकवी, संगमनेर ५१, वेल्हा, विंझर ५२, निमगाव सावा, बेल्हा ५६, कुडे ५९, मंचर ५३,

मराठवाडा : चिखलठाणा ५५, चित्तेपिंपळगाव ५७, आडूळ ८२, काचनेर, नांदूर, विहामांडवा ५१, पाचोड ९०, भेंडाळा ५४, शेंदूरवादा ९५, डोणगाव ५९, लाडगाव ६८, घाईगाव ६३, बाबतारा ५२, चिखलठाणा ५०, रामनगर ६६, अंबड ५९, धनगरपिंपरी ६२, रोहिलागड ६४, सुखापुरी ६५, आष्टी ५१, शेळगाव ९४, बावने ६१, कु. पिंपळगाव ७१, अंतरवळी ७२, रांजणी ७०, बीड ७०, पाली ७५, म्हाळसजावळा ५४, नळवंडी ७५, मांजरसुभा ५०, लिंबागणेश ७४, पाटोदा ७८, थेरळा ५२, गेवराई ५३, जातेगाव ५२, धोंडराई ६४, उमापूर ७५, रेवकी ५२, कित्तीडगाव ५०, नित्रूड ६७, दिदरूड ७४, लोखंडी ५३, घाटनांदूर, होळ ५१, बनसारोळा ६७, परळी ६५, नागापूर, सिरसाळा ५१, तळेगाव ५८, वाडवणी ५४, कावडगाव ६५, तिंतरवणी ६१, लिंबजगाव ११६, तरोडा ५२, नाळेश्वर ५१, मुखेड ६५, जांब ८१, कुरुला ८६, फुलवल ५७, पेठवडज, बारूळ ६५, दिग्रस ८६, कारखेली, अर्धापूर ५२, जरीकोट ५१, दाभड ५०, नायगाव ५६, परभणी शहर ६१, जांब ५०, झरी ५३, शिंगणापूर ६२, पिंगळी ५१, परभणी ग्रामीण ५३, महातपुरी ८५, माखणी ५८, बाभळगाव ६९, बामणी ५०, कावलगाव ५२, पेठशिवानी ५०, रावरांजूर ६३, सोनपेठ ८०, आवलगाव ५६, शेळगाव ६६, वडगाव ७२

- दीर्घ विश्रांतीनंतर कोकणात मुसळधार पाऊस

- कुडाळ येथे १९३ मिलिमीटरची नोंद

- खानदेशात सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस

- घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला

- नगर, पुणे जिल्ह्यांतील धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू

- मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com