Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी; वारणा पाणलोट क्षेत्रात संततधार

Rain Update : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम असून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी नोंदवली गेली.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम असून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी नोंदवली गेली. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने येत्या चौवीस तासांत वक्रद्वाराद्वारे पाणी सोडले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.

वारणा पाणलोट क्षेत्रात रविवारी (ता. २१) सकाळी आठ ते सोमवारी (ता. २२) सकाळी आठ २४ तासांत १४८ मिलिमीटर पाऊस झाला. वारणा नदीकाठची पिके पाण्याखाली गेली असून वारणा नदीवरील मांगले-सावर्डे, कोकरूड-रेठरे, शिराळे खुर्द-माणगाव हे तीन बंधारे पाण्याखाली गेल्याने शिराळा व शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील काही गावांचा जवळचा संपर्क तुटला आहे.

जिल्हाभर पावसाची संततधार सुरू राहिली. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरू होती. कोयना धरणातून विसर्ग बंद असतानाही नदीची पाणी पातळी वाढते आहे. शिराळा तालुक्यात पाच दिवसांपासून संततधार कायम सुरू आहे.

वारणा धरण परिसरात रविवारी (ता. २१) सकाळी आठ ते सोमवारी (ता. २२) सकाळी ८ या चोवीस तासांत १४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली. खुंदलापूर-मणदूर दरम्यानच्या मुख्य घाट रस्त्यावर जाधववाडी ते मणदूर दरम्यानच्या घाटात पावसाच्या पाण्यामुळे मुख्य रस्त्याचा काही भाग खचला. दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावली.

वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी आहे. शिराळा तालुक्यातील धनगरवाडी येथे रविवारी (ता. २१) एका दिवसात २६५ मिलिमीटर तर निवळे येथे १३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात २७ हजार ५५७ क्युसेक प्रतिसेंकद पाण्याची आवक आहे. धरणातून कालवा व विद्युत निर्मिती करून १५९५ क्युसेकने पाणी वारणा नदीत सोडले जात आहे.

त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. गेल्या २१ दिवसांत ८ वेळा अतिवृष्टी झाली आहे. वारणा नदीवरील मांगले-सावर्डे, कोकरूड-रेठरे, शिराळे खुर्द-माणगाव हे तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. रविवारी रात्री पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, दुपानंतर पुन्हा शिराळा तालुक्यासह अन्य भागात पावसाचा जोर वाढला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Amravati Gram Panchayat : अमरावतीत ५५१ ग्रामपंचायतींवर १७४ प्रशासकांची नियुक्ती

Kanhapur Crop Inspection : कान्हापूर येथे पिकांची पाहणी

Digital Shutdown In Ahilyanagar : अहिल्यानगरला सातशेपेक्षा अधिक कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप केले परत

Ahilyanagar Public Health : अहिल्यानगरला असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी

Maharashtra Drought: दुष्काळाची स्थिती भयावह, पंचनामे, निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- विजय वडेट्टीवार

SCROLL FOR NEXT