Maharashtra Rain Alert : उत्तर महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Rain Forecast : कमी दाबाचे क्षेत्र, किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा पूरक ठरल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा सुरूच आहे. आज (ता. २३) कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : कमी दाबाचे क्षेत्र, किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा पूरक ठरल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा सुरूच आहे. आज (ता. २३) कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ठळक कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागले असून, मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे जाण्याची संकेत आहेत.

हा पट्टा राजस्थानच्या जैसलमेर पासून, अजमेर, गुणा, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, छत्तीसगड, चांदबली ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. दक्षिण गुजरातपासून ते केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्राच्या मध्य भागातून पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्परविरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे.

Rain Update
Heavy Rain : मुसळधारेने धरणांच्या साठ्यात वाढ

कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा कायम होता. सोमवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये साताऱ्यातील महाबळेश्वर येथे राज्यातील उच्चांकी २४१ मिलिमीटर, घाटमाथ्यावरील ताम्हिणी येथे २३० मिलिमीटर कोयना पोफळी येथे २१० मिलिमीटर, रत्नागिरीतील राजापूर येथे २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र विदर्भात काही ठिकाणी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला. उर्वरित ढगाळ हवामानासह राज्यात हलक्या ते मध्यम सरी पडल्या.

Rain Update
Monsoon Rain : कोणत्या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार ? राज्यात पुढील ४ दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

आज (ता. २३) कोकणातील रत्नागिरी, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड’ अलर्ट आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट आहे. मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

रत्नागिरी, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदुरबार, धुळे, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com