Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : नांदेडमधील सर्वच तालुक्यांत भीज पाऊस

Rain Alert : गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी २८.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात भीज पावसाचा मुक्काम वाढला आहे. बुधवारी दुपारनंतर सुरू झालेला पाऊस अद्याप सुरू आहे. गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी २८.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात झाला. नांदेडमध्ये आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ४००.४० मिलिमीटरनुसार ४४.९० टक्के झाला आहे. पावसाची गती कमी-अधिक होत असलीतरी प्रमाण अधिक नसल्याने अद्याप नदी-नाल्यांना पाणी आले नाही.

नांदेड जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस नांदेडच्या सर्वच जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात झाला आहे. या पावसामुळे खरिपातील पिके तरारली आहेत. जिल्ह्यात ता. एक जून ते २५ जून या कालावधीत ३५२.४० सरासरी मिलिमीटर पडणे अपेक्षीत होते.

या तुलनेत आजपर्यंत ४००.९० मिलिमीटरनुसार ४४.९० टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यात बुधवारी दुपारनंतर सुरू झालेला पाऊस अद्याप सुरू आहे. गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २८.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांत झाला.

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटर)

नांदेड २८.२०, बिलोली २४, मुखेड ४३.९०, कंधार २०.१०, लोहा २१.२०, हदगाव १८.८०, भोकर २२.६०, देगलूर ३७.२०, किनवट २३.२०, मुदखेड ३४.४०, हिमायतनगर १७.४०, माहूर १४.६०, धर्माबाद २६.२०, उमरी २६.३०, अर्धापूर २७.१०, नायगाव ३२.३०. सरासरी २८.८० मिलिमीटर झाला.

विष्णुपुरीचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार

शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प गुरुवारी (ता. २५) ८३ टक्के क्षमतेने भरला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल. यामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Season: मोहोळमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी पिके जोमात

Solar Agri Pump: सौर कृषी पंपाच्या तक्रारींसाठी महावितरणचा ‘डिजिटल’ पुढाकार

Well Funds: नुकसानग्रस्त विहिरींच्या भरपाईसाठी शासनाकडून निधी

Turmeric Research Center: हळद संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी हितकारक: नयनी खरडे

Gopinath Munde Scheme: सुरक्षा योजनेत शेतकरीच असुरक्षित

SCROLL FOR NEXT