Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : अकोला जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस

Rain Update : आजवर रिमझिम होत असलेला पाऊस मागील २४ तासांत जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये सक्रिय झाला आहे. सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी दिली आहे.

Team Agrowon

Akola News : आजवर रिमझिम होत असलेला पाऊस मागील २४ तासांत जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये सक्रिय झाला आहे. सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी दिली आहे. बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यांमध्ये ४० मिलिमीटरपेक्षा अधिक, तर अकोल्यात ३२.३, पातूर ३४.३, बाळापूर ३२.१, तेल्हारा १९, अकोटमध्ये २६.१ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी ३२.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम राहिलेली आहे. गेल्या २४ तासांतील पावसाने काही प्रमाणात काही तालुक्यांमध्ये ही उणीव भरून काढली आहे. बुधवारी (ता.२४) सकाळपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस तसेच काही भागांत पावसाचे वातावरण राहिले. बुलडाणा जिल्ह्यात घाटाखालील तालुक्यांत पावसाचा जोर राहिला.

जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर, शेगाव, नांदुरा, मोताळा, खामगाव तालुक्यांमध्ये पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यात रिसोड वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला. वाशीममध्ये १३.१, मालेगाव १८.५, मंगरूळपीर ४०.१, मानोरा २४.३, तर कारंजात ३२.२ मिमी पाऊस पडला.

आजवर वाण प्रकल्पात साठा वाढत नसल्याने चिंता निर्माण झाली होती. मात्र सततच्या पावसाने धरणात पाणी वाढू लागले आहे. बुधवारी सकाळी या धरणात २६.६६ टक्के साठा झाला. प्रकल्पात २१.८५ दलघमी उपयुक्त साठा असून, एकूण साठा २३.३६ दलघमी एवढा आहे.

काटेपूर्णातील पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील काटेपूर्णा या प्रकल्पातील पाणीसाठ्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने साठ्यात वाढ होत आहे. बुधवारी (ता.२४) या प्रकल्पात ३४.७७ टक्के साठा झाला होता. यात उपयुक्त ३०.०२ दलघमी तर एकूण ४१.३४ दलघमी साठा झाला होता. धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस होत असल्याने साठा वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT