Water Storage : नांदेडमधील प्रकल्पात १५.८९ दलघमीने वाढला पाणीसाठा

Water Crisis : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने प्रकल्पात येवा सुरू झाला आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Nanded News : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने प्रकल्पात येवा सुरू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू एकूण १०४ प्रकल्पात १५.८९ दलघमीने वाढ होऊन १६२.३७ दलघमी उपयुक्त साठा झाला आहे.

तसेच नांदेडकरांची तहान भागविणाऱ्या ’विष्णुपुरी’च्या जलसाठ्यात सध्या ३४.६३ दलघमी साठा झाला. यात ७.६३ दलघमीने वाढ झाली आहे. तापमानातही घट झाल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण घटले आहे. तरी, मागील वर्षीच्या तुलनेत (२०८.४९ दलघमी) आजच्या तारखेतील प्रकल्पातील साठा ४६.१२ दलघमीने कमीच आहे.

Water Storage
Water Storage : येलदरीत २७.१९ टक्के पाणीसाठा

नांदेड जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघू असे एकूण १०४ प्रकल्प आहेत. यात १६२.३७ दलघमी उपयुक्त साठा आहे. त्याची टक्केवारी २२.३० आहे. यात गोदावरी नदीवरील काळेश्‍वर येथील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात गेल्या आठवड्यात २७ दलघमी पाणीसाठा होता.

त्यात ७.६३ दलघमी वाढ होऊन सध्या ३४.६३ दलघमी उपयुक्त साठा आहे. त्याची ४२.८६ इतकी टक्केवारी आहे. तसेच मानार प्रकल्पात मागील आठवड्यात ३०.७१ दलघमी इतका साठा होता. यात १.१३ दलघमीने वाढ होऊन ३१.८४ दलघमी साठा झाला असून, त्याची टक्केवारी २३.०४ आहे. तसेच मध्यम ९ प्रकल्पांत मागील आठवड्यात १८.८० दलघमी साठा होता, यात ४.५९ दलघमीने वाढ होऊन २३.३९ दलघमी उपयुक्त साठा झाला आहे.

त्याची टक्केवारी १६.८२ आहे. उच्च पातळी ९ बंधाऱ्यांत मागील आठवड्यात ४४.६६ दलघमी उपयुक्त साठा होता. यात ०.४४ ने वाढ होऊन ४५.१० दलघमी पाणी साठा झाला आहे. त्याची टक्केवारी २३.७६ झाली आहे. तर ८० लघू प्रकल्पात मागील आठवड्यात २५.३१ दलघमी पाणी साठा होता. यात २.१ दलघमीने वाढ होऊन २७.४१ दलघमी उपयुक्त साठा आहे. त्याची टक्केवारी १५.८६ आहे. दरम्यान, मागील वर्षी सुरुवातीला झालेल्या एक ते दोन पावसाने प्रकल्प तुडुंब भरली होती.

Water Storage
Water Storage : मराठवाड्यात वाढेना पाणीसाठा

मुखेडमध्ये १५ टँकर, ३६ विहिरींचे अधिग्रहण

मागील आठवड्यात मुखेड, कंधार, देगलूर व किनवट या चार तालुक्यांत प्रशासनाने विहिरींचे अधिग्रहणाला मुदत वाढ दिली होती. परंतु आता परिस्थिती बदली असून मुखेडमध्येच वरच्या भागातील गावे आणि वाड्यांमध्ये ३६ विहिरींचे अधिग्रहण व १५ टँकरने पाणीपुरवठा करण्यास मुदत वाढ दिली आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा (दलघमी) व टक्केवारी

विष्णुपुरी प्रकल्प ३४.६३ ४२.८६ टक्के

येलदरी २३९.८६ २९.६२ टक्के

सिद्धेश्‍वर ०० ०० टक्के

इसापूर ३२१.३१ ३३.३३ टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com