Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : दमदार पावसामुळे रब्बी हंगामाला पोषक वातावरण

Rainy Weather : सातारा जिल्ह्याच्या सर्वच भागात दमदार पाऊस झाल्याने प्रमुख धरणासह लहान-मोठे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहेत. यामुळे रब्बी हंगामास पोषक वातावरण झाले असून मशागतीची कामे सुरू झाली आहेत.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्याच्या सर्वच भागात दमदार पाऊस झाल्याने प्रमुख धरणासह लहान-मोठे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहेत. यामुळे रब्बी हंगामास पोषक वातावरण झाले असून मशागतीची कामे सुरू झाली आहेत. या हंगामात सर्वाधिक कांदा, रब्बी ज्वारी तसेच दुष्काळी तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढणार आहे.

जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा या दुष्काळी तालुक्यांचा रब्बी हंगाम प्रमुख असल्याने या पाच तालुक्यांत रब्बीची सर्वाधिक पेरणी होत असते. या दुष्काळी तालक्यासह जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख कोयना, धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी यासह दुष्काळी तालुक्यातील येरळवाडी, नेर, आंधळी हे प्रकल्पही शंभर टक्के भरले आहेत. यामुळे मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.

यंदाच्या खरिपात तीन लाख हेक्टरवर खरिपाची पेरणीही झाली आहे. यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पेरणी झाली आहे, त्याखालोखाल भात, बाजरी, खरीप ज्वारी ही पिके आहेत. खरिपात अति पावसामुळे शेतात पाणी साचल्याने घेवडा, सोयाबीन, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र हाच पाऊस रब्बी हंगामाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.

माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्यांत रब्बी हंगामाची मशागतीची कामे सुरू झाली आहेत. कांदा पिकास मागील दोन वर्षांत दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे कांदा पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. कांदा बियाण्याचा सध्या तुटवडा जाणवत आहे. कांदा बी दोन ते अडीच हजार रुपये दराने विक्री सुरू आहे. लागवडीसाठी लागणारी रोपवाटिका तयार केली जात आहे. तसेच भांडवली खर्चात बचत तसेच मजूरटंचाई यामुळे बीबीएफ तसेच इतर यंत्राद्वारे कांदा पेरणीची कामे सुरू झाली आहेत.

तसेच मागील वर्षी रब्बी ज्वारीचे दर चांगले मिळाले होते. जनावरांच्या चाऱ्यासाठी या हंगामात रब्बी ज्वारीची सर्वाधिक केली जाणार आहे. त्यादृष्टीने कामे सुरू झाली आहेत. दुष्काळी तालुक्यात पाण्याची उपलब्धता होईल तसतसे उसाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. या हंगामातही उसाचे क्षेत्र वाढणार आहे. कृषी विभागाकडून या हंगामासाठी ३९ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी केली असून यामध्ये रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, मका आदी पिकांचा समावेश आहे. तसेच एक लाख सात हजार टन रासायनिक खत रब्बीसाठी मागणी केली असून खरिपातील ४५ हजार टन खत उपलब्ध आहे.

खरिपातील पिकांची काढणी सुरू झाली आहे. पावसामुळे घेवड्याचे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील मशागतीची कामे सुरू झाली आहेत. तसेच आता कांदा लागवडीची तयारी केली जात आहे.
ज्योती मोरे, महिला शेतकरी, भोसरे, ता.खटाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT