Rabi Seed
Rabi SeedAgrowon

Rabi Season 2024 : रब्बी हंगामासाठी बियाणे विक्रीसाठी सुरू

Rabi Seed : महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून यंदाच्या (२०२४-२५) हंगामासाठी ज्वारी, करडई, हरभरा व गहू पिकांच्या वेगवेगळ्‍या वाणांची सुधारित बियाणे उपलब्ध आहेत.
Published on

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून यंदाच्या (२०२४-२५) हंगामासाठी ज्वारी, करडई, हरभरा व गहू पिकांच्या वेगवेगळ्‍या वाणांची सुधारित बियाणे उपलब्ध आहेत. विद्यापीठातील कार्यक्षेत्रासह राज्यातील शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कार्यक्षेत्रात कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी (रब्बी २०२३- २४) हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारी, करडई, हरभरा व गहू पिकांचा मूलभूत व प्रमाणित, सत्यप्रत बीजोत्पादन कार्यक्रम राबविलेला आहे.

Rabi Seed
Rabi Season 2024 : रब्बी हंगामासाठी ४५ हजारांवर क्विंटल बियाण्यांची मागणी

गेल्या वर्षी उत्पादित केलेली बियाणे यंदाच्या रब्बी (२०२४-२५) हंगामात पेरणीसाठी ज्वारी, करडई, हरभरा व गव्हाची बियाणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय व कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

राहुरी येथील मध्यवर्ती बियाणे विक्री केंद्रावर व कृषी संशोधन केंद्र, चास, (ता. जि. नगर) येथे ज्वारीच्या फुले रेवती, फुले वसुधा, फुले सुचित्रा, फुले यशोमती, फुले मधूर, फुले रुचिरा, करडईच्या फुले भिवरा (एसएसएफ- १३- ७१) विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

हरभऱ्याचे विजय, फुले विश्‍वराज, दिग्विजय, विशाल, फुले विक्रम, फुले विक्रांत व गव्हाचे फुले समाधान या वाणांचे बियाणे ऑक्टोबर- २०२४ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर येथे करडईच्या फुले भवरा (एसएसएफ- १३-७१) या वाणांचे प्रमाणित /सत्यप्रत बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Rabi Seed
Rabi Season 2024 : खानदेशात रब्बीत सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी, ता. निफाड या विक्री केंद्रावर हरभऱ्याच्या दिग्विजय, विशाल, फुले विक्रम, फुले विक्रांत व गव्हाच्या फुले समाधान या पिकांच्या वाणाचे बियाणे ऑक्टोबर २०२४ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. कृषी तंत्र विद्यालय, मांजरी फार्म ता. हवेली, जि. पुणे या विक्री केंद्रावर गव्हाचे फुले समाधान या वाणांचे प्रमाणित/ सत्यप्रत बियाणे ऑक्टोबर २०२४ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, जि. सातारा व कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथील विक्री केंद्रावर गव्हाचे फुले समाधान या वाणाचे बियाणे ऑक्टोबर- २०२४ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी त्यांच्या नजीकच्या कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रावर, कृषी महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय व कृषी विज्ञान केंद्र येथे बियाण्यांसाठी संपर्क साधून सुधारित वाणांची बियाणे पेरणीसाठी उपलब्ध करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com