Farmers Demand Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची मागणी

Heavy Rain Crop Loss : तेल्हारा तालुक्यात मंगळवारी (ता. २७) झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Akola News : तेल्हारा तालुक्यात मंगळवारी (ता. २७) झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, असे निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना दिले.

मंगळवारी मॉन्सूनपूर्व पाऊस रात्रभर आल्याने शेतातील ज्वारी, केळी, भुईमूग, तीळ, कांदा, मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आधीच कोणत्याही पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

त्यामध्ये या पावसामुळे फटका दिला. तेल्हारा येथे तहसील कार्यालयात निवेदन देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी नीलेश नेमाडे, अमोल मसुरकार, रितेश देशमुख, अनिल मानकर, अंकुश तायडे, दीपक कौठकार,

मजहर अली मिरसाहेब, नीलेश सावळे, सागर चिम, प्रवीण सित्रे, गुलाम जाकिर, गोपाल घोडेस्वार, देविदास नेमाडे, विकास इंगळे, संदीप रोहणकार, प्रफुल्ल देशमुख, प्रशांत रत्नपारखी, विनोद धुळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

तेल्हारा तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसामुळे शेतातील कांदा, ज्वारी, मका, भुईमूग, तीळ, केळी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता शेतातील पिकांचे पंचनामे करून त्वरित मदत करावी.
- लक्ष्मिकांत कौठकार, विदर्भ अध्यक्ष, शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Harvesting: कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणीला आली गती

Ethanol Industry: राज्यात जितका उपयोग तितकेच इथेनॉल खरेदी

Parth Pawar Land Controversy: चौकशी समितीच्या अहवालात सर्व तथ्ये समोर येतील : पवार

Cotton Production: खानदेशात एक लाख कापूसगाठींचे उत्पादन

Soybean Rate: मध्य प्रदेशात सोयाबीनला १३०० रुपये भाव फरक

SCROLL FOR NEXT