
Pune News: पुणे जिल्ह्यात ६ ते २५ मे दरम्यान झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेली शेती पिके, फळपिकांचे तसेच शेतजमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण दोन हजार ४७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे ५८४ गावांतील ३ हजार ९०८ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून हे मोठे नुकसान झाले असल्याचे नजर अंदाजाच्या अहवालावरून समोर आले आहे.
पुणे जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीबाबतचा नजर अंदाजाद्वारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने नुकसानीची माहिती घेतली. त्यावरून इंदापूर, खेड, भोर, पुरंदर, आंबेगाव, मावळ यासह सर्वच तालुक्यांतील पिकांच्या नुकसानीची माहिती पुढे आली आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जिरायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले नसले तरी बागायती क्षेत्रावरील पिकांचा आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे.
जिरायती पिकांना हेक्टरी ६५०० रुपये, तर बागायती पिकांना हेक्टरी १३ हजार ५०० रुपये, तर फळपिकांना हेक्टरी १८ हजार रुपयांची नुकसानीचे सानुग्रह अनुदान देण्यात येते. नजर अंदाजाद्वारे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. संबंधित तहसीलदारांनी नुकसान झालेल्या काही ठिकाणी पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून, कृषी व महसूल विभागाच्या संयुक्तपणे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात खेड तालुक्यात सर्वाधिक सुमारे ३५५ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ इंदापूर तालुक्यातही ३१५, पुरंदर २८९ हेक्टरवर नुकसान झाले आहे. उन्हाळी पिकांचे व भाजीपाल्याचे मोठे क्षेत्र आहे. हवेली, शिरूर, बारामती, जुन्नर, दौंड तालुक्यांतील अनेक भागांत काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये कांदा, केळी, आंबा, उन्हाळी बाजरी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.
तालुकानिहाय झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)
तालुका --- गावांची संख्या -- शेतकरी संख्या -- नुकसानीचे क्षेत्र, हेक्टर
हवेली -- १५ -- १४० -- ११०
खेड -- १६० -- ११९३ -- ३५५
मावळ -- १७ -- १३४ -- ६५
शिरूर -- ७० -- २४२ -- १४०
दौंड -- ६९ -- ३६६ -- २१३
बारामती -- ९८ -- ३४५ -- २०१
इंदापूर -- ९० -- ४४७ -- ३१५
मुळशी -- २७ -- १५५ --६१
आंबेगाव -- ६ -- १४२ -- ९८
पुरंदर -- ११ -- ३६८ -- २८९
भोर -- ३ -- २० -- ५
जुन्नर -- १५ -- ३११ -- १८८
वेल्हे -- ३ -- ४५ -- ७
एकूण -- ५८४ -- ३९०८-- २०४७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.