Poultry Farm Heat Wave agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Farm Heat Wave : उष्माघाताने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलं; पोल्ट्रीधारकांचे नुकसान

Heat Wave Poultry Farm : अतिउष्णतेचा परिणाम शेतीसह पोल्ट्री व्यवसायावर होत आहे. अतिउष्णतेमुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Poultry Farm : वाढत्या उष्म्यामुळे पोल्ट्री फार्ममधील पक्षी मृत्युमुखी पडत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. अतिउष्णतेचा परिणाम शेतीसह पोल्ट्री व्यवसायावर होत आहे. अतिउष्णतेमुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

उष्णतेपासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचा खर्च वाढला आहे.

अतिउष्णतेमुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री व्यावसायिक पोल्ट्रीमध्ये फॉगर, स्प्रिंकलर, फॅन, बारदान पोती, पत्र्याच्या शेडवर उसाचे पाचट टाकून त्यावर पाणी मारणे अशा उपाययोजना करत आहेत, तरीही उष्णतेमुळे पक्ष्यांचा मृत्यू होत आहे.

पक्ष्यांचे वजनही घटत आहे. सध्या दिवसा प्रचंड ऊन आणि सायंकाळी वळवाचा पाऊस असे वातावरण आहे. पोल्ट्रीतील पिल्ले नाजूक असतात. त्यांना उष्णतेची झळ सहन होत नाही.

कागल, राधानगरी व भुदरगड तालुक्यांत पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. उष्णतेमुळे कोंबड्या कमी खाद्य खातात. परिणामी, त्यांचे वजन कमी भरत आहे. अतिउष्णता पक्ष्यांना हानिकारक ठरत आहे. यावर्षी मार्च-एप्रिल महिन्यांमध्ये अतिउष्ण वातावरणामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा पोल्ट्री व्यावसायिकांना अधिक नुकसानकारक ठरत आहे.

उन्हाळ्यात मागणीही कमी

जिल्ह्यात तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. उष्माघाताने कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे कागल, राधानगरी व भुदरगड तालुक्यांतील पोल्ट्री व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. गतवर्षी दररोज १५ ते २० कोंबड्या मरत होत्या, तर यावर्षी १० ते १२ टक्क्यांनी मर वाढली आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. सोबतच अंडी उत्पादनातही घट झाली आहे. उन्हाळ्यात कोंबड्यांची मागणी घटते, त्यामुळे कंपनीकडून पक्ष्यांची उचल वेळेत होत नाही. त्याचा व्यवसायाला फटका बसत असल्याचे पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

Kashmir Cold Weather : हिमवृष्टीने काश्‍मीरमध्ये थंडीचा कडाका वाढला

Memorandum of Understanding : दापोली येथील कृषी विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाशी करार

Sugar Factory : वेळेत परवाने दिल्याने ३८ कारखान्यांची धुराडी पेटली

Farmer Producer Organizations : ‘एफपीओं’ना बीजोत्पादनात आणा; केंद्राच्या सूचना

SCROLL FOR NEXT