Farmer Income : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्‍वासन देणारे उघडे पडले

Udhhav Thackeray : या देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे आश्‍वासन जनतेला देण्यात आले होते. पण आज प्रत्यक्षात कापूस, सोयाबीनला काय दर मिळतो आहे?
Udhhav Thackeray
Udhhav Thackeray Agrowon
Published on
Updated on

Buldana News : या देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे आश्‍वासन जनतेला देण्यात आले होते. पण आज प्रत्यक्षात कापूस, सोयाबीनला काय दर मिळतो आहे? दुप्पट उत्पन्नाचे आश्‍वासन देणारे उघडे पडले, अशी टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रविवारी (ता. २१) रात्री येथे झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. स्थानिक खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करीत ठाकरे म्हणाले, की शिवसेनेने त्यांना आमदार, खासदार, मंत्री केले. मात्र, त्यांनी गद्दारी करीत शिवसेना फोडणाऱ्यांची साथ दिली. पण आता जनता गद्दारीचे उत्तर देईल.

Udhhav Thackeray
Farmer Income Tax: सरकारनं शेतकऱ्यांवर आयकर लावला तर नुकसान कुणाचं?

देशात सध्या केवळ गुजरातचा विकास सुरू असून मोदींनी उर्वरित देश वाऱ्यावर सोडला आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवरील जे मोठे नेते भाजपच्या धमक्यांना जुमानत नाहीत, अशांना ‘ईडी’द्वारे जेलमध्ये टाकण्यात येत असून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे.

Udhhav Thackeray
Farmer Income : दुप्पट उत्पन्नाच्या ‘गॅरंटी’ला बगल

हुकूमशाहीविरुद्ध लोकशाही अशी थेट लढत या वेळी निवडणुकीत होत असून जनतेने अशा हुकूमशहा व गद्दारांना मतदानातून धडा शिकवावा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. व्यासपीठावर राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस खासदार मुकूल वासनिक, महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे उपस्थित होते.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांत वाद

जिल्ह्यात ‘मविआ’च्या विजयाबाबत शंका उपस्थित होत आहेत. त्यातच नेत्यांमध्येही आपसांतील वाद उद्भवत आहेत. उद्धव ठाकरे यांची सभा आटोपताच काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा व काँग्रेस सेवादलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या वाद झाला. या प्रकरामुळे सभास्थळी काही काळ गोंधळ झाला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com