Weather  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Weather : विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटा शक्य

Weather Update : मे महिन्यामध्ये देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Pune News : मे महिन्यामध्ये देशाच्या बहुतांश भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमीच्या सरी कोसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.  

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी बुधवारी (ता. १) या महिन्यातील कमाल, किमान तापमान, पावसाचा अंदाजाविषयी माहिती दिली. मे महिन्यात देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. तर पूर्वोत्तर राज्य, वायव्य भारत, मध्य भारत व लगतचा दक्षिण द्वीपकल्पाच्या भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे.

दरम्यान, दक्षिण राजस्थान, पश्‍चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि गुजरात या भागात ५ ते ८ उष्ण लाट दिवसांची शक्यता आहे. राजस्थानचा उर्वरित भाग, पूर्व मध्य प्रदेश, पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगडचा काही भाग, अंतर्गत ओडिशा, पश्‍चिम बंगालचा दक्षिण भाग, झारखंड, बिहार, उत्तर अंतर्गत कर्नाटक, तेलंगणा, उत्तर तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात २ ते ४ उष्ण लाट दिवसांचा इशारा देण्यात आला आहे.  

विदर्भात सरासरीपेक्षा कमी तापमानाचा अंदाज असला तरी उष्ण लाटा येण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील तापमानाच्या अंदाजात स्पष्टता नसली, तरी उष्ण लाटा येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता अधिक आहे.

सरासरी पावसाचा अंदाज

मे महिन्यात देशात ९१ ते १०९ टक्के म्हणजेच सरासरी इतक्या पावसाचा अंदाज आहे. १९७१ ते २०२० या काळातील आकडेवारीचा विचार करता मे महिन्यात देशात ६१.४ मिलिमीटर पाऊस पडतो. वायव्य भारत, मध्य भारताचा काही भाग, दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्वोत्तर भारताच्या काही भागांत उत्तर भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राचा विचार करता विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरासरी पावसाची शक्यता आहे.

‘एल निनो’ निवळतोय

विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या ‘एल निनो’ स्थिती असून, समुद्राच्या पाण्याचे तापमान कमी होऊ लागले आहे. मॉन्सून हंगामाच्या सुरुवातीला एल-निनो निवळून, समुद्र पृष्ठभागाचे तापमान सामान्य पातळीवर येण्याचे संकेत आहेत. हिंद महासागरातील इंडियन ओशन डायपोल स्थिती (आयओडी) सध्या सर्वसाधारण असून, पावसाळ्यात आयओडी स्थिती धन (पॉझिटिव्ह) होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT