Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Weather Forecast : हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला.
Weather
WeatherAgrowon

Pune News : हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला. 

हवामान विभागाने कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

Weather
Weather Update : उन्हाचा पारा पुन्हा चाळीशीपार; वादळी पावसाचा इशारा

विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी आज आणि उद्या विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला.

Weather
Maharashtra Rain : वादळी पावसाचा आजही इशारा; विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम

तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

सोमवारी मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर मध्य महाराष्ट्रातील नागर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. मंगळवारीही मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com