Sugarcane Rate Protest agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate Protest : ऊस आंदोलनाची ही वेळ नाही, राजू शेट्टींना हसन मुश्रीफांचे आवाहन

Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना केला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Sugarcane News : शासनाने ठरवलेली एफआरपी कोल्हापुरात एकरकमी दिली जाते. को-जन, इथेनॉल परताव्यातील नफा दिला जातो. अस्तित्वात असलेल्या सर्व कायद्यांचे कारखान्यांकडून पालन केले जात असताना चारशे रुपये जादा देण्याची मागणी कितपत रास्त आहे.

असा सवाल कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना केला आहे. कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात काल(ता.०६) जनता दरबार भरवण्यात आला होता यावेळी ते म्हणाले.

याचबरोबर यंदा हंगाम १०० दिवसांचा आहे, ९ महिने कर्मचाऱ्यांना बसून पगार द्यावा लागणार आहे. संकट मोठे आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना विनंती आहे की, आंदोलनाची ही वेळ नव्हे. कारखानदारांना सहकार्य करा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

तसेच एकीकडे कर्नाटक, सांगली, साताऱ्यातील साखर कारखाने सुरू असताना कोल्हापुरातील कारखाने अजून बंद आहेत. यंदा ऊस कमी आहे, चार दिवसांवर दिवाळी आहे, त्याकाळात मजूर येणार कधी, हंगाम सुरू होणार कधी असा प्रश्न आहे. त्यामुळे शेट्टींनी सहकार्य करावे व हंगाम सुरू करण्याचा मार्ग मोकळा करावा असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टी यांना आवाहन केले आहे.

राजू शेट्टी तडजोड करण्यास तयार पण

माझी मागणी ४०० रुपये दुसरा हफ्ता द्या अशी आहे. हा आग्रह सोडतो तुम्ही काय मार्ग काढणार सांगा मलाही संघर्ष नको असल्याचे शेट्टी म्हणाले. तुम्ही सध्या प्रतिनीधी म्हणून आला आहे तुमच्या मालकांना मालकांना काय सांगणार सांगा. लवकरात लवकर मार्ग काढायला सांगा आणि शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे चांगले मिळतील असा मार्ग काढण्यास सांगा.

साखर कारखानदारांनी योग्य तो तोडगा काढावा जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत कारखाने सुरू करायचे नाहीत असाही इशारा शेट्टी यांनी दिला. कारखाना रेटून चालू करायचा आणि आंदोलन मोडून काढणार अशी चर्चा मला ऐकायला मिळत आहे असा प्रयत्न झाल्यास आमची संघटनाही जशास तसे उत्तर देण्यास तयार असल्याचेही शेट्टी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT