Raju Shetti Protest March : जयंत पाटलांच्या कारखान्यापासून राजू शेट्टींची आक्रोश पदयात्रा सुरू, जोरदार शक्तीप्रदर्शन

Maratha Arakshan : राजू शेट्टी यांची मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन खंडित केलेली ५२२ किमीची केलेली सुरू झाली आहे.
Raju Shetti Protest March
Raju Shetti Protest Marchagrowon
Published on
Updated on

Akrosh Padytra Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन ५२२ किमीची स्थगित केलेली आक्रोश पदयात्रा शुक्रवारी (ता. ३) सकाळी सातपासून जयंत पाटील यांच्या साखराळेतील राजारामबापू कारखान्यापासून सुरू होणार आहे.

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून राजू शेट्टी यांनी २२ दिवसाची ५२२ किलोमीटरची आक्रोश यात्रा १३ व्या दिवशी स्थगित केली होती. त्या पदयात्रेस शुक्रवारी सकाळी सात वाजता राजारामबापू साखर कारखाना साखराळेतून सुरुवात होणार आहे.

सकाळी ६.३० वाजता राजू शेट्टी निवासस्थानापासून साखराळेकडे रवाना होणार असून आठ वाजता कारखाना प्रशासनास निवेदन देऊन तिथून हुतात्मा कारखाना - नागठाणे अंकलखोप भिलवडी व वसगडे मुक्कामी असतील.

स्वाभिमानीच्या मागणीमुळे ऊस तोडण्या रद्द

राज्य सरकारने १ नोव्हेंबरपासून राज्यातील हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले, पण ‘स्वाभिमानी’ने तत्पूर्वीच ज्या ठिकाणी तोडी चालू आहेत त्या रोखणे, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर फोडणे, ती पेटवणे असे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनानेच यात तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Raju Shetti Protest March
Raju Shetti : कारखानदारांसोबत चर्चेसाठी दरवाजे खुले, राजू शेट्टींचे आवाहन

सध्यातरी या तोडग्यावर निर्णय झाला नाही. परंतु पुढच्या काही दिवसांत ही पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढला जाईल आणि जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी आपण घेऊ, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.

शेतकरी संघटनांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने ऊस तोडणी सुरू झाली नसल्याचे चित्र आहे. शिरोळ हातकणंगले तालुक्‍यात, तर एखाद दुसऱ्या कारखान्यानेच ऊसतोडणी सुरू होती. काही ठिकाणी साखर अडवणे, ट्रॅक्‍टर अडवणे आदी प्रकार सुरू असल्याने कारखान्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com