Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Dam Water Update : राज्यातील धरणाच्या पाणी पातळी वाढली का?

Maharashtra Dam Water Level : जून आणि जुलैमध्ये काही भागात अतिवृष्टी तर काही भाग कोरडाच राहिला होता. त्यात आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसानं दडी मारली आहे.

Team Agrowon

Dam Water News : जून महिन्यात केवळ ५४ टक्के पाऊस पडला. परंतु जुलैच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात पडलेल्या पावसानं सरासरी भरून काढली होती. मात्र ऑगस्ट उजडला तरीही राज्यातील धरणातील जलसाठयात वाढ झाली नाही.

त्यातच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पाऊसमान कमीच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जून आणि जुलैमध्ये काही भागात अतिवृष्टी तर काही भाग कोरडाच राहिला होता. त्यात आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसानं दडी मारली आहे. ज्या भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे, अशा भागातील धरणं भरली असली तरी पावसांचं प्रमाण कमी असलेल्या भागातील धरणं कोरडीच आहेत.

धरणातील पाणीसाठी

पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश धरणं भरली आहेत. सातारा जिल्ह्यातील वांग धरण ७२ टक्के भरलं आहे. या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण भरलं आहे. तर निळवंडे धरणात ८५ टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या पाण्याचा दोन हजार क्युसेकनं विसर्ग करण्यात येत आहे. मराठवड्यातील बहुतांश धरणात मात्र अजूनही पाणीसाठी वाढलेला नाही.

 दरम्यान, जुलैमध्ये कोकण, पूर्व विदर्भ, परभणी, नांदेड वगळता इतर भागांत पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी, पश्‍चिम महाराष्ट्रातील उजनी आदी मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा स्थिती चिंताजनक आहे.


ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील धरणांत केवळ ५६ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो जवळपास १४ टक्क्यांनी कमी होता. त्यात यापुढे कमी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख धरणे भरतील की नाही, या विषयी शंका आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणी संकट गंभीर होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT