Bajari Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Bajari Harvesting : इंदापूर तालुक्यात बाजरी काढणीची लगबग

Bajari Production : आगाप पेरणी केलेले बाजरीचे पीक काढणीस आले असून, पावसाच्या अगोदर बाजरीची काढणी व मळणी करण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.

Team Agrowon

Kalas News : इंदापूर तालुक्यात सध्या खरिपातील बाजरी पिकाच्या काढणीत शेतकरी व्यग्र आहेत. आगाप पेरणी केलेले बाजरीचे पीक काढणीस आले असून, पावसाच्या अगोदर बाजरीची काढणी व मळणी करण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.

जूनच्या पहिल्याच आठवड्यात तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने, उन्हाळ्यात पेरणीपूर्व मशागतीची कामे केलेल्या शेतकऱ्यांनी बाजरी पेरणीस प्राधान्य दिले. यामुळे तालुक्यात यंदा सरासरीच्या ९१.५ टक्के क्षेत्रावर बाजरीची पेरणी झाली आहे.

बाजरीला शासनाने २६२५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र सध्या बाजरीला प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल १५०० ते ३२०० रुपये बाजारभाव मिळत आहे.

मंडलनिहाय बाजरी पेरणीचे क्षेत्र

इंदापूर तालुक्यात बाजरीचे सरासरी क्षेत्र ११८९.२६ हेक्टर आहे. यापैकी इंदापूर मंडल -९०.४ हेक्टर, बावडा मंडल -१९० हेक्टर, सणसर मंडल - ३६९.५ हेक्टर आणि भिगवण मंडल - ४३८ हेक्टर असे १०८७.९ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. पेरणी झालेले क्षेत्र सरासरीच्या ९१.५ टक्के आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT