Bajari Farming : बाजरी पीक काढणीच्या अवस्थेत

Bajari Cultivation : पुणे जिल्ह्यात यंदा अनेक शेतकऱ्यांनी खरीप बाजरी लागवडीवर भर दिला आहे. त्यामुळे बाजरीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.
Bajari Harvesting
Bajari HarvestingAgrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यात यंदा अनेक शेतकऱ्यांनी खरीप बाजरी लागवडीवर भर दिला आहे. त्यामुळे बाजरीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सध्या अनेक ठिकाणी बाजरी पीक कणसाच्या व काढणीच्या अवस्थेत आहे. तर लवकर पेरणी केलेल्या ठिकाणी काढणीला सुरूवात झाली आहे. बाजरीचे चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

खरीप हंगामात रोग, किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी बाजरीकडे वळत आहेत. मात्र, यंदाही शेतकऱ्यांचा खरीप बाजरी लागवडीकडे अधिक ओढा असल्याचे दिसून येते.

Bajari Harvesting
Bajari Rate : बाजरीला चांगली मागणी

त्यातच सरकारकडून मिलेट वर्ष साजरे केले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये बाजरी पिकाविषयी महत्त्व वाढीस लागले आहे. त्यामुळे यंदा खरिपात सरासरी ४७ हजार ५१८ हेक्टर एवढे क्षेत्र आहे. त्यापैकी ४४ हजार ५४५ हेक्टर म्हणजेच ९४ टक्के पेरणी झाली आहे.

Bajari Harvesting
Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

जिल्ह्यातील बाजरी लागवडीमध्ये झालेल्या क्षेत्रामध्ये सध्या काढणीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत. शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे मजूर रोजगारासाठी मिळत नसल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. साडेतीनशे रुपये मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

तालुकानिहाय झालेली खरीप बाजरीची पेरणी, हेक्टरमध्ये

तालुका सरासरी क्षेत्र बाजरीची पेरणी

हवेली ११३१ १०२१

भोर १०० ३५

जुन्नर २३४२ ५२४

आंबेगाव २०४६ १८५५

शिरूर १७,७२३ १४,३८८

बारामती ७२६५ १०,७४७

इंदापूर ११८९ ९७०

दौंड ३०७८ ४४०१

पुरंदर ३०७८ ४४०१

एकूण ४७,५१८ ४४,५४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com