Bajari Sowing : बाजरीच्या क्षेत्रात यंदा ४१ हजार हेक्टरने वाढ

Kharif Season : खरीप पिकांची वेळेत पेरणी झाल्याने यंदा बाजरीच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत ४१ हजार हेक्टरने वाढ झाली आहे.
Bajari Farming
Bajari FarmingAgrowon
Published on
Updated on

Nagar News : खरीप पिकांची वेळेत पेरणी झाल्याने यंदा बाजरीच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत ४१ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टअखेर राज्यात ३ लाख ६१ हजार ९५१ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ४ लाख ३ हजार १३७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या सहा वर्षांच्या बाजरी पेरणी क्षेत्राची तुलना केली तर क्षेत्रात घट होताना दिसत आहे. विशेष म्हणजे बाजरीला अलीकडे आहारात मागणी असतानाही बाजारातील दरातही फारशी वाढ नाही.

राज्यात यंदा खरिपाची आतापर्यंतची स्थिती चांगली आहे. १५२ लाख ९७ हजार ३९४ हेक्टर खरिपाचे सरासरी क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत १४६ लाख ४९ हजार ९१६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत १४२ लाख ५४ हजार ७५७ हेक्टरवर पेरणी झाली होती. म्हणजे यंदा खरिपाची राज्यात गेल्या वर्षीपेक्षा सव्वाचार लाख हेक्टरवर क्षेत्र वाढले आहे.

Bajari Farming
Bajari Sowing : खानदेशात बाजरीची पेरणी सुरूच; क्षेत्र स्थिर राहणार

यंदा पाऊसमान चांगले असल्याने बाजरीच्या क्षेत्रातही ४१ हजार हेक्टरने गेल्या वर्षीपेक्षा वाढ झाली आहे. गतवर्षी राज्यात ३ लाख ६१ हजार ९५१ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा आतापर्यंत ४ लाख ३ हजार १३७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सर्वाधिक नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर सरासरी क्षेत्र असून, आतापर्यंत ७७ हजार हेक्टरवर पेरणी झाली.

Bajari Farming
Bajari Rate : बाजरीला चांगली मागणी

नाशिकमध्ये १ लाख ११ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असून, ५६ हजार म्हणजे ५० टक्क्यांच्या जवळपास पेरणी झाली आहे. पुण्यात यंदा सरासरीएवढी म्हणजे ४६ हजार हेक्टर, साताऱ्यात ४५ हजार हेक्टर, सांगली ५० हजार हेक्टर, धुळ्यात ४४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

राज्यातील वर्षनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टर)

२०१८-१९ ६,०९,६००

२०१९-२० ६,७२,७८०

२०२०-२१ ६,८७,५००

२०२१-२२ ६,४४,७४०

२०२२-२३ ४,९१,३००

२०२३-२४ ३,६१,९३१

२०२४-२५ ४,०३,१३७

(३० ऑगस्टपर्यंत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com