Hapus  Agrowon
ॲग्रो विशेष

Hapus Season : हापूसचा हंगाम तीन टप्प्यांत विभागण्याची शक्यता

Mango Season : देवगड हापूस आंब्याचा नियमित हंगाम मार्चमध्येच सुरू होईल, अशी स्थिती असून आंब्याचा हंगाम या वर्षी तीन टप्प्यांत विभागण्याची शक्यता आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News : देवगड हापूस आंब्याचा नियमित हंगाम मार्चमध्येच सुरू होईल, अशी स्थिती असून आंब्याचा हंगाम या वर्षी तीन टप्प्यांत विभागण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवगड हापूससाठी मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जिल्ह्यात या वर्षी थंडीचा अभाव जाणवत आहे. वातावरण सतत बदलत असल्यामुळे त्याचा देवगड हापूससह इतर आंबा हंगामावर देखील परिणाम जाणवणार आहे. देवगड हापूसची देशविदेशांतील ग्राहकांना पसंती असते. मात्र या वर्षी हापूसचा नियमित हंगाम कधी सुरू होईल याबाबत उत्सुकता लोकांमध्ये होती.

या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ५ ते १० टक्के, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ३० ते ४० टक्के झाडांना मोहोर आला असून, उर्वरित झाडांना आता जानेवारीत मोहोर फुटण्याची प्रकिया सुरू आहे. सप्टेंबर महिन्यातील आंबा परिपक्व होण्यासाठी ११० ते ११५ दिवसांची गरज भासते. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत आलेला मोहराचा आंबा परिपक्व होण्यास १०५ ते ११० दिवस, तर जानेवारीमधील आंबा परिपक्व होण्यास ९५ ते ९८ दिवसांचा कालावधी लागतो.

पहिल्या टप्प्यातील किरकोळ आंबा परिपक्व होऊन बाजारपेठेत देखील दाखल झाला. परंतु नियमित हंगामाचा आंबा साधारणपणे मार्चच्या पहिल्या किवा दुसऱ्या आठवड्यात बाजारपेठेत दाखल होणार आहे.

त्यानंतर मात्र हा हंगाम सलग राहणार असून, तिसऱ्या टप्प्यातील आंबा एप्रिल-मे महिन्यांत बाजारपेठेत उपलब्ध होईल. त्यामुळे नियमित हंगामातील आंब्यासाठी ग्राहकांना मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

पाच डझन पेटीला २० ते २२ हजार रुपये दर

सप्टेंबर महिन्यातील आंबा नोव्हेंबर महिन्यात परिपक्व झाला. साधारणपणे देवगड तालुका आणि परिसरातून १०० हून अधिक आंबा पेट्यांची विक्री झाली असण्याचा अंदाज असून, पाच डझनाच्या पेटीला साधारणपणे २० ते २२ हजार रुपये दर मिळाला आहे. तर सध्या पाच डझनाच्या पेटीचा दर १० हजार रुपयांच्या जवळपास आहे.

जिल्ह्यात थंडीचे प्रमाण अत्यल्प राहीले आहे. त्याचा परिणाम आंबा पिकांवर दिसून येत आहे. मात्र थंडीच्या तुलनेत झाडांना मोहर चांगला आला आहे. दिवस आणि रात्रीतील तापमानामध्ये खूप फरक जाणवत आहे. परिणामी, तुडतुडे, फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आंबा पिकांवर जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदारांनी सावधगिरी बाळगावी.
- डॉ. विजय दामोदार, शास्त्रज्ञ, रामेश्वर संशोधन उपकेंद्र, देवगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT