Hapus Mango: हापूस बाजारात कधी दाखल होणार?

Team Agrowon

कोकणात यंदा थंडी उशिरा सुरू झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर काही भागात बहरल्याने हा आंबा फेब्रुवारीपर्यंत मिळू शकेल. मात्र, पाडव्यानंतरच हापूस बाजारपेठेत विक्रीला येईल, असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे.

Miyazaki Mangoes

उत्तरेकडून येणाऱ्या शितलहरींचा प्रवाह अल्प प्रभावी ठरत असल्याने कोकणकिनारपट्टी भागात थंडीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Mango Rate | Agrowon

पहाटे काही प्रमाणात धुक्यासह आर्द्रतेत वाढ होऊन कमाल तापमान खाली येत आहे. तरी सकाळी आठनंतर तापमानात कमालीची वाढ होत आहे.

Mango Rate | Agrowon

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये देशासह राज्यातील काही शहरांचा पारा घसरला असताना कोकणात मात्र उकाडा होता. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचा जोर वाढला.

Mango Rate | Agrowon

बागायतदारही अपेक्षित थंडीच्या चिंतेने ग्रासले आहेत. जानेवारीमध्ये अपेक्षित थंडी न पडल्यास आंबा मोहोरावरील फुटीचा वेग मंदावण्याची भीती आहे.

mango | agrowon

फुटीचा वेग मंदावल्यास त्याचा परिणाम फळधारणेवर आणि उत्पादनावरही होण्याची भीती बागायतदार व्यक्त करीत होते.

mango | agrowon
क्लिक करा