Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Payment : नोव्हेंबरचे अर्धे मानधन मिळणार अग्रिम स्वरूपात

ATMA Project : दिवाळी सणामुळे राज्यातील आत्माअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यातील १५ दिवसांचे मानधन अग्रिम स्वरूपात अदा केले जाणार आहे.

Team Agrowon

Akola News : दिवाळी सणामुळे राज्यातील आत्माअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यातील १५ दिवसांचे मानधन अग्रिम स्वरूपात अदा केले जाणार आहे. आत्मा प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे यांनी याबाबत राज्यातील सर्व प्रकल्प संचालकांना सूचना केली आहे.

कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तारविषयक सुधारणाकरिता सहाय्य (आत्मा) अंतर्गत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक व संगणक आज्ञावली रूपरेषक हे करार तत्त्वावर कार्यरत आहेत.

या कर्मचाऱ्यांना सद्यःस्थितीत देण्यात येणारे मानधन निश्‍चित व एकत्रित असून या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर कोणत्याही प्रकारचा शासकीय लाभ देण्यात येत नाही. त्यामुळे दिवाळी सणासाठी या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचे १५ दिवसांचे मानधन हे अग्रिम स्वरूपात अदा करावे असे तांभाळे यांनी म्हटले आहे.

किमान पूर्ण मानधन तरी द्यायला हवे

राज्यात आत्माअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळत नाही. त्यांना निश्‍चित मानधन देण्यात येते. ही रक्कम कमी असून दिवाळीसाठी त्यातीलच अर्धे मानधन देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मात्र, पूर्ण मानधनच मुळात कमी आहे. त्यातही आता अर्धा निधी दिला जात आहे. किमान पूर्ण महिन्याचे मानधन तरी अग्रीम स्वरूपात द्यायला पाहिजे होते, अशी भावना कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढतेय

Modern Farming Techniques: शेतकऱ्यांनी जाणले संत्रा-कापूस पिकाचे तंत्रज्ञान

Agriculture Department Inspection: खत-बियाणे विक्रेत्यांना दणका

Rainfall Sowing Advisory: मॉन्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये : दत्तकुमार कळसाईत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर

SCROLL FOR NEXT