Agriculture Department : कृषी विभागाच्या इमारतींसाठी आराखडा सादर करण्याचे निर्देश

Agriculture Office condition : विभागीय कृषी सहसंचालकासह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच रामेती अशा कृषी विभागाच्या अधिनस्थ सर्वच कार्यालयांची दुरवस्था झाली आहे.
Agriculture Office Condition
Agriculture Office ConditionAgrowon
Published on
Updated on

Amravati News : विभागीय कृषी सहसंचालकासह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच रामेती अशा कृषी विभागाच्या अधिनस्थ सर्वच कार्यालयांची दुरवस्था झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या कार्यालयासाठी नवीन इमारतीचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश कृषी मंत्रालयाच्या स्तरावरून ३१ ऑक्टोबरला देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या कार्यालयाच्या दुरवस्थेचा मुद्दा ‘ॲग्रोवन’ने २८ ऑक्टोबरच्या अंकातून मांडला होता.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Agriculture Office Condition
Sugarcane Season : ऊसदराची दुसरी बैठकही निर्णयाविना

आमदार बच्चू कडू यांच्यासह रवी राणा, खासदार नवनीत राणा, ॲड. यशोमती ठाकूर अशा दिग्गज नेत्यांची लांबलचक यादी असलेल्या जिल्ह्यातच ‘कृषी विभागाच्या इमारती मोडकळीस’ अशा आशयाचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने दिले होते. राज्यभरात शेती, शेतकरी अशा मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या या नेत्यांच्या जिल्ह्यातच कृषी विभागाला सुयोग्य इमारती नव्हत्या.

Agriculture Office Condition
Rabi Sowing : सातारा जिल्ह्यात रब्बीची २८ टक्के क्षेत्रावर पेरणी

त्यामुळे या इमारतींना पावसाळ्यात गळती लागत असल्याने त्यावर ताडपत्री अंथरण्याची वेळ येत होती. यासाठी निधी उपलब्धतेबाबत एकाही नेत्याकडून आजवर आग्रह धरण्यात आला नाही. दरम्यान ‘ॲग्रोवन’च्या बातमीची दखल घेत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांनी कृषी आयुक्‍तालयस्तरावरून अमरावती सहसंचालक कार्यालयासाठी तत्काळ आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार आयुक्‍तालयातील मृद्संधारण सहसंचालक पांडुरंग शेळके यांनी अमरावती विभागीय कृषी सहसंचालकांना नवीन इमारत बांधकामासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रक तयार करून त्यास सक्षम अधिकाऱ्याची तांत्रिक मान्यता घेण्यास सांगितले आहे. त्यानंतर शासन मान्यतेसाठी हा प्रस्ताव दाखल केला जाणार आहे. या पत्राची अमरावती विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून दखल घेत आराखडा अंतिम करण्यासाठीच्या हालचाली वाढल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com