Agriculture Department : कृषी विभागातील रिक्‍त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्‍त ताण

Latest Agriculture News : तब्बल ५० टक्क्यांपेक्षा अधिक पद रिक्‍त असल्याने शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी त्यासोबतच नैसर्गिक आपत्ती काळात पिकाचे संरक्षण, पंचनामे करणे अशी कामे राहतात.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Bhandara News : रिक्‍त पदांमुळे कृषी विभागाच्या विस्तार कार्याला खिळ बसली आहे. मोहाडी तालुक्‍यातही रिक्‍त पदांमुळे हे काम प्रभावीत झाले असून ५० टक्क्यांपेक्षा अधिक पदे या ठिकाणी रिक्‍त आहेत.

तालुक्‍याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३८,०१०,९३ हेक्‍टर आहे. खातेदारांची संख्या ४१,३९३ इतकी आहे. मात्र पुरेसा कर्मचाऱ्यांअभावी या भागातील कृषी विभागाचे कामकाज प्रभावीत झाले आहे.

Agriculture Department
Agriculture Department : ‘कृषी’च्या सहा कंत्राटी वाहनचालकांना मानधन मिळेना

तब्बल ५० टक्क्यांपेक्षा अधिक पद रिक्‍त असल्याने शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी त्यासोबतच नैसर्गिक आपत्ती काळात पिकाचे संरक्षण, पंचनामे करणे अशी कामे राहतात. परंतु कर्मचाऱ्यांअभावी ही कामे देखील रेंगाळतात किंवा कर्मचाऱ्यांवर ही कामे करण्याचा अतिरिक्‍त ताण राहतो.

Agriculture Department
Agriculture Department News : कृषी विभागातील पदोन्नत्यांचा प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावा

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून ही बाब गांभीर्याने घेत वरिष्ठांना याबाबतचा अहवाल पाठविला जातो. वरिष्ठ कार्यालयामार्फत विभागीय कृषी सहसंचालकांना तो अहवाल जातो. हीच प्रक्रिया प्रामाणिकपणे पार पाडली जाते. त्यापुढे भरतीबाबतचा विचार होत नसल्याने परिस्थिती जैसे थे आहे. परिणामी ही पदे लवकरात लवकर भरण्यात यावी, अशी मागणी आहे.

...अशी आहे रिक्‍तपदे

तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एकूण कर्मचाऱ्यांची ५० पदे मंजूर आहेत. त्यापैकी २६ पदे रिक्‍त आहेत. कृषी सहाय्यक हा विभाग आणि शेतकऱ्यांमधील दुवा ठरतो. परंतु कृषी सहायकाच्या २५ पदांपैकी फक्‍त ९ भरलेली असून १६ रिक्‍त आहेत. परिणामी शेतकरी कार्यालयात आला त्यावेळी कृषी सहाय्यक दौऱ्यावर अशी स्थिती राहाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com