Kolhapur News : रक्तदान शिबिरातून तरुणाईच्या बलस्थानाचा उपयोग सामाजिक कार्यात करून माणुसकीचे नातं जोडण्याचं काम गुरुदत्त परिवाराने केले असल्याची गौरवोद्गार आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी काढले.
शिवजयंतीनिमित्त गुरुदत्त शुगर्सच्या कार्यस्थळावर आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्री. आवाडे बोलत होते. ते म्हणाले, की कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने भरीव सामाजिक कार्य केले आहे.
महापूरसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये हजारो पूरग्रस्तांना व मुक्या जनावरांना आधार देण्याचे मोठे पुण्यकर्म घाटगे परिवारांनी केले आहे. तसेच शेतकरी हा केंद्रबिंदू मानून कारखान्याने शेतकरी हित जोपासले आहे.
राहुल घाटगे म्हणाले, की गेल्या वर्षीमध्ये पाच रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सहा हजार बॉटल संकलित करण्यात आल्या. वृद्धाश्रम व अनाथ आश्रमास मदत, शाळेतील मुलांना वह्या वाटप अशा सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा केला जात होता.
येथून पुढे महापुरुषांच्या जयंती निमित्त डॉल्बी व इतर खर्चिक पद्धतीला फाटा देत रक्तदान शिबिरे, वक्तृत्व स्पर्धा, आरोग्य शिबिर, व्यसनमुक्तीवर प्रबोधन, करिअर व्यवस्थापन आदी विषयांवर प्रबोधन करून तरुणाईला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक - निंबाळकर, विजय भोजे, अरविंद माने, मुकुंद गावडे, उदय डांगे कारखान्याचे संचालक शिवाजीराव माने देशमुख, बबन चौगुले, अण्णासाहेब पवार, शिवाजी सांगले, धोंडिराम नागणे, विठुल ढवळे आदी या वेळी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.