Gurudatta Sugars : गुरुदत्त शुगर्स'चं सामाजिक कार्य: नागरिकांच्या मदतीला सदैव तत्पर

Sugar Factory : घाटगे यांनी कारखान्याच्या माध्यमातून केलेल्या विविध प्रकारच्या सामाजिक कार्याबदल दिल्ली येथील सिया या संस्थेकडून श्री. घाटगे यांना शुगर-इथेनॉल-बायोएनर्जी या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
Sugar Factory Award
Gurudatta Sugars Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : येथून पुढील काळातदेखील नैसर्गिक आपत्तीच्या व इतर सामाजिक कार्यात ‘गुरुदत्त शुगर्स’ परिवार नागरिकांच्या पाठिशी उभा राहील, असे मत ‘गुरुदत्त शुगर्स’चे चेअरमन माधवराव घाटगे यांनी नवी दिल्ली येथे व्यक्त केले.

घाटगे यांनी कारखान्याच्या माध्यमातून केलेल्या विविध प्रकारच्या सामाजिक कार्याबदल दिल्ली येथील सिया या संस्थेकडून श्री. घाटगे यांना शुगर-इथेनॉल-बायोएनर्जी या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

बॉलिवूड अभिनेत्री हिना खान यांच्या हस्ते श्री. घाटगे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सामाजिक कार्यातून परिसराचा कायापालट केला आहे. कारखान्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या दहा हजार कुटुंबीयांना रोजगार मिळाला आहे.

Sugar Factory Award
Parner Sugar Factory : पारनेर कारखानाप्रकरणी आरोपींच्या अटकेची मागणी तीव्र

शिरोळ तालुक्यात २००५, २०१९, २०२१ व २०२४ च्या महापुरात कारखान्याने १० हजार पूरग्रस्त व ५ हजार जनावरांना स्व: खर्चाने छावणी उभी करून मानवतेचे कार्य करून हजारोंना आधार देण्याचे काम केले.

Sugar Factory Award
Sugar Factory Award : ‘गुरुदत्त शुगर्स’चे अध्यक्ष घाटगे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

कोरोना महामारीच्या काळात पाच हजार ऊसतोडणी मजूर, शिरोळ तालुक्यातील एक हजार रिक्षाचालक व जोतिबा डोंगरावरील एक हजार पुजारी यांना महिनाभर पुरेल इतके जीवनाश्यक साहित्याचे वाटप केले. सैनिक टाकळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी सिरींजची कमतरता होती.

त्याची दखल श्री. घाटगे यांनी घेत तत्काळ पन्नास हजार सिरींज उपलब्य केली त्यामुळे अनेक नागरिकांना कोरोना लसीकरण होण्यास मदत झाली. तसेच नागरिकांना तीस हजार अर्सेनिक अल्बम या रोगप्रतिकार गोळ्याचे वाटप केले. खासगी कारखाना असताना देखील कारखान्याने केलेल्या उपक्रमाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com