Rain Update In Maharashtra : राज्यातील १४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट; मॉन्सूनने महाराष्ट्र व्यापला
IMD Weather Update: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनची वाटचाल वेगाने सुरु असून बुधवारी (ता.२४) मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सूनने मंगळवारी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भातील काही भाग वगळता महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारली.