Highway Blockade: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना घोषित केल्याप्रमाणे पीकविमा भरपाई मिळावी आणि रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत करावा, या प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २३) बर्दापूर फाट्यावर अंबाजोगाई-लातूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली..बीड जिल्ह्यात गत खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे प्रतिहेक्टर १७,५०० रुपयांची विमा भरपाई द्यावी, तसेच खतांच्या वाढीव किमती कमी करून पुरवठा नियमित करावा, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले..Farmers Protest: सरकारच्या भूमिकेविरोधात मुंबईत शेतकऱ्यांचे आंदोलन.शेतकरी नेते अविनाश मोरे, ॲड. अजय बुरांडे, विलास बापू मोरे, सुरेश घोडके, धनाजी मदने, गोविंद मोरे, भागवतराव निकम, श्रीहरी होळकर, संजय गिराम, निलेश धुमाळ, तानाजी धुमाळ, विलास धुमाळ, उसामराव जांभळे, गोविंद चव्हाण, .Nashik Farmer Protest: ...अन्यथा विधिमंडळावर मोर्चा काढू.अमोल चव्हाण, नितीन शिंदे, वसंत शिंदे, विलास देशमुख, सादेक हुसेन, विभीषण औताडे, बबन भगत, मंचकराव जाधव, राजेभाऊ चव्हाण, नाना यादव, हनुमंत धुमाळ, वैभव काळम आदींच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी भर उन्हात रस्त्यावर ठाण मांडून बसले होते..आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांनी बैलगाडी रस्त्यावर आडवी लावून निषेध व्यक्त केला. मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाल्याने परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलन शांततेत पार पडले असून प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.