Sugarcane Straw Agrowon
ॲग्रो विशेष

Straw Management : पुरंदर येथे पाचट व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Agriculture Guidance : उसाच्या उत्पादन वाढीसाठी पाचट व्यवस्थापन महत्त्वाचे असून, यासाठी गावोगावी शेती शाळा प्रकल्प घेण्यात येत आहे.

Team Agrowon

Pune News : उसाच्या उत्पादन वाढीसाठी पाचट व्यवस्थापन महत्त्वाचे असून, यासाठी गावोगावी शेती शाळा प्रकल्प घेण्यात येत आहे. यामाध्यमातून पाचट न जाळता ते कुजवण्याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी दिली.

पाचट जाळल्याने पर्यावरणीय समस्येबरोबरच मातीचे पोषणमूल्य घटत असते. हे टाळण्यासाठी पाचट व्यवस्थापनामध्ये पाचटाची कुट्टी करणे, त्यावर कल्चरची फवारणी करणे, काही प्रमाणात खोड तोडणे, कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे. याबाबतचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.

पाचट न जळाल्याने जमिनीतील नत्र, कर्ब आणि सुक्ष्म जिवाणू जिवंत राहतात. नवीन फूट चांगली होऊन उसाच्या उत्पादनात चांगली वाढ होते हे मांडकी परिसरात प्रात्यक्षिकातून दाखविण्यात आले आहे. साखर कारखाना आणि कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पाचट कुजवण्याच्या कल्चरचा पुरवठा करण्यात येत, असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

ज्वारी फुलोऱ्यात, कीड नियंत्रणासाठी सूचना

थंडीमुळे ज्वारी फुलोऱ्यात आली असून, उशिराच्या लागवडीची ज्वारी वाढीच्या अवस्थेत असून हरभरा फुलो-यात तर गव्हाचे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. चाऱ्याच्या मकेवर काही प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव असला तरी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी टाळतात.

गव्हावर तांबेराचा प्रादुर्भाव असल्यास बुरशीनाशकाची फवारणी आणि हरभरा पिकावरील घाटेआळीच्या बंदोबस्तासाठी ट्रॅप्स लावण्याच्या सूचना शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने देण्यात येत आहे. दर आठवड्याला चार ते पाच ठिकाणी पाहणी करण्यात येत असून कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यकांच्या बैठका घेऊन सूचना देत असल्याचे जाधव यांनी सांगितले.

रब्बीच्या ८७ टक्के पेरण्या पूर्ण

पुरंदर तालुक्यात रब्बी हंगामातील तृणधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य या प्रमुख पिकांच्या ८७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. याबरोबरच चारा पीक, कांदा, टोमॅटो, इतर फळभाज्या, पालेभाज्या, फुलशेती, ऊस या पिकांखाली सरासरी ८४ टक्के पेरण्या झाल्या असून, ५ हजार ३६८ हेक्टरवर हरभरा, रब्बी वाटाणा, पावटा, घेवडा व इतर कडधान्ये असून याची पेरणी ११४ टक्के झाल्याचे सूरज जाधव यांनी सांगितले. तर कांदा आणि गव्हाचा पेरा आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT