Sugarcane Farm Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : पाण्याच्या कमतरेमुळे ऊस पिकाची वाढ खुंटली

Water Scarcity : यंदा पाऊस कमी झाला. त्यामुळे पाण्याची कमतरता भासतेय. त्यामुळे उसाची वाढ खुंटली असून अपेक्षित फुटवेही मिळण्यास अडचणी येत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर उसाची लागवड केली असून १ लाख ७ हजार ८५० हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा पाऊस कमी झाला. त्यामुळे पाण्याची कमतरता भासतेय. त्यामुळे उसाची वाढ खुंटली असून अपेक्षित फुटवेही मिळण्यास अडचणी येत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

जिल्ह्यात गतवर्षी पावसाने दडी मारली. त्याचा फटका ऊस लागवडीला बसला आहे. त्यामुळे आडसाली हंगामातील उसाच्या लागवडीच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे चित्र आहे. आडसाली हंगामात उसाची लागण ३२ हजार ७८३ हेक्टरवर झाली आहे. येत्या गाळपास जाणाऱ्या उसाची लागवड पूर्ण झाली असून १ लाख ७ हजार ८५० हेक्टरवर झाली आहे.

आडसाली हंगामातील ऊस पिकातील भरणीची कामे उरकली आहेत. आडसाली, पूर्व हंगाम आणि सुरू हंगामातील उस पीक वाढीच्या अवस्थेत आहेत. आडसाली हंगामातील ऊस ८ ते १० कांडीवर आहे. तर पूर्व हंगामातील ऊस पीक फुटव्याच्या अवस्थेत असून आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. सुरू हंगामातील ऊस पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

वास्तविक, जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट तीव्र होऊ लागले आहे. पाटबंधारे विभागाकडील लघू व मध्यम प्रकल्पात १९ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. भूजल पातळीही कमी झाली आहे. त्यामुळे ऊस पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

पाणी कमी पडत असल्याने त्याचा परिणाम ऊस पिकावर होऊ लागला आहे. उसाची वाढ खुंटली असून फुटवेही अपेक्षित मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पीक वाढीच्या काळात पाणी कमी पडत असल्याने उत्पादनातही घट होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नुकताच संपलेल्या गाळप हंगामात १ लाख ३५ हजार ६८८ हेक्टरवरील कारखान्यांनी गाळप केले. यंदा कमी पाऊस पाण्याची कमतरता या साऱ्यामुळे उसाच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. यावर्षी गाळपास १ लाख ७ हजार ८५० हेक्टरवर उसलागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७ हजार ८३८ हेक्टरने क्षेत्रात घट झाली आहे.

जिल्ह्यातील ऊस लागवड स्थिती

तालुका.... क्षेत्र (हेक्टरमध्ये)

मिरज...२०४०७

जत...५०३५

खानापूर...१४५१८

वाळवा...२२९८३

तासगाव...१००३४

शिराळा...८५२०

आटपाडी...११०४

कवठेमहांकाळ...३५३६

पलूस...६२३८

कडेगाव...१५४२९

एकूण...१०७८५०

ऐन ऊस वाढीच्या काळात पाण्याची कमतरता भासू लागली. त्यामुळे उसाची वाढ खुंटली असून अपेक्षित फुटवेही निघाले नसल्याने अडचण निर्माण झाले आहे.
- संदीप पाटील, ऊस उत्पादक शेतकरी, गोठखिंड, ता. वाळवा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT