Sugarcane Management : उसाची बाळबांधणी का करावी? बाळबांधणीचे फायदे

Sugarcane Balbandhani : उसाच्या आंतरमशागतीतील सगळ्यात महत्वाच काम म्हणजे उसाला भर देण्याच म्हणचे बाळबांधणी करण्याच. पण बाळभरणी करत असताना अलीकडे भरणीमध्ये बरेच गैरसमज झालेले आहेत.
Sugarcane Management
Sugarcane ManagementAgrowon

Sugarcane Crop : उसाच्या आंतरमशागतीतील सगळ्यात महत्वाच काम म्हणजे उसाला भर देण्याच म्हणचे बाळबांधणी करण्याच. पण बाळभरणी करत असताना अलीकडे भरणीमध्ये बरेच गैरसमज झालेले आहेत. उसाची बाळबांधणी का करावी, बाळबांधणी नेमकी केंव्हा करावी? यामध्ये गल्लत होताना दिसतो. बाळबांधणी विषयी कृषीसंशोधक आणि ऊसतज्ज्ञ डॉ. अंकुश चोरमुले यांनी दिलेली माहिती पाहुया. 

उसाचे फुटवे जर मर्यादीत ठेवायचे असतील तर उसाला योग्य वेळी माती लावण म्हणजेच बाळबांधणी करण खूप गरजेच आहे. आपण काय करतो उसाला माती लावायला चाल ढकल करतो. किंवा बाळबांधणी चुकीच्या वेळेला करतो. 

बऱ्याच वेळेला शेतकरी एकच बांधणी करतात.  असं न करता योग्य वेळी बाळबांधणी करण अत्यंत गरजेच आहे.

बाळबांधणी का करावी? 

बाळंबांधणी करण्यामागचा सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे उसाच संख्या नियोजन चांगल होत. उसाची जाडी चांगली यायला मदत होते. पाण्याचही योग्य नियोजन करता येत. उसाची योग्य संख्या ठेवण्यामागच कारण म्हणजे अनेक शेतकरी उसाला जेवढे फुटवे येतील तेवढे फुटवे ठेवायचा प्रयत्न करतात. तेव्हढे फुटवे जगवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्याला वाटत कारखाण्याला जास्त ऊस जाईल आणि जास्त उतारा मिळेल. पण आपल इथेच चुकत.  हा गैरसमज आपण काढूण टाकला पाहिजे. उसाला फुटवे हे मर्यादीतच ठेवले पाहिजेत. समजा उसाची पाच बाय दीड फूट अंतरावर लागवड केली असेल तर एका गड्ड्यामध्ये सातच ऊस ठेवावेत. त्यामुळे एका उसाच वजन दोन ते तीन किलो पर्यंत जाऊ शकत आणि उसाचा उतारा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. 

Sugarcane Management
Sugarcane Cultivation : बेणे प्रक्रिया करूनच उसाची लागवड करावी

बाळबांधणी केंव्हा करावी?

लागवडीनंतर उसामध्ये ७० ते ८० दिवसा दरम्यान बाळबांधणी करावी.  ज्या वेळेला साहा सात फुटवे दिसायला लागतील त्यावेळेला बाळबांधणी करावी. त्यासाठी रिव्हर्स पावर टिलर चालवून माती उडवून माती उसाच्या बुडख्यात पडली पाहिजे. याची काळजी घ्यायची. माती जर बुडख्यात पडली नाही तर मोठ्या बांधणीच्या वेळेला परत उचलून माती टाकली जात नाही. त्यामुळे काय अडचण होते तर परत पुढच्या वेळेला जी गव्हाण राहीलेलेी असते म्हणजे जी दोन उसामध्ये जागा शिल्लक राहते त्यामध्ये परत उचलून ही माती पडत नाही. त्यामुळे उसाला चांगल्या पद्धतीने भर लागत नाही. त्यामुळे लक्षात घ्या सुरुवातीच्या बाळबांधणीला एकदाच माती उचलून पडली पाहिजे. साधारणपने उसाची एखादी कांडी खाली बुडल इतकी माती लावावी. बाळबांधणी करताना पावर टिलर आपण रिव्हर्स चालवतो समजा कोंबांची उंची थोडी कमी वगैरे असेल तर कडेचे एखादे दुसरे पाते जरी काढून आपण बाळबांधणी केली तर चालू शकते.

उसाच्या जातीनूसार फुटव्यांची वाढ वेगवेगळी असते.उसाच्या को ८६०३२ जातीमध्ये ७० दिवसामध्ये देखील बाळबांधणी करता येते. फक्त उसाच्या फुटव्यांच्या वाढीच्या स्पीडवर आपल्याला ही बाळबांधणी करावी लागते. या जातीमध्ये बाळबांधणी करताना दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात पहिली म्हणजे त्यात उसामध्ये गव्हाण राहिली न पाहिजे आणि दुसरी म्हणजे शेतात जर योग्य प्रकारे वाफसा नसेल म्हणजे माती जास्त ओली किंवा जास्त कोरडी असू नये त्यामुळे माती उचलून टाकली जात नाही. अशाप्रकारे उसाची बाळबांधणी करताना काळजी घेतली तर नक्कीच ऊस उत्पादन वाढण्यास मदत होईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com