Kharif Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : खरीप पिकांची वाढ खुंटली ; पुणे विभागात पावसाअभावी पिकांवर परिणाम

Kharif Crop : सध्या पावसाच्या खंडामुळे पुणे विभागात पिकांची वाढ खुंटली असून, पिके कोमेजून जात आहेत.

Team Agrowon

Pune News : पावसाचे तीन महिने उलटले तरीही पुणे विभागात पुरेसा पाऊस झालेला नाही. उशिराने झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरण्या केल्या असल्या, तरी सध्या पावसाच्या खंडामुळे पुणे विभागात पिकांची वाढ खुंटली असून, पिके कोमेजून जात आहेत. येत्या चार ते आठ दिवसांत पाऊस न झाल्यास सर्व पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

यंदा खरीप हंगामातपुणे विभागात सरासरीच्या दहा लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी ११ लाख ८३ हजार ८२८ हेक्टर म्हणजेच १११ टक्के पेरण्या झाल्या आहेत. परंतु पावसाच्या तीन महिन्यांच्या कालावधीत ३९७ मंडलांपैकी १६४ मंडलांत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड आढळून आला आहे. तर ८८ मंडलांत १५ ते २१ दिवस खंड आढळून आला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये भात पिकाची ५९,६७९ हेक्टर क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे. सद्यःस्थितीत भातपीक वाढीच्या अवस्थेत असून, पश्‍चिम भागात चांगल्या पावसामुळे पीक परिस्थिती समाधानकारक आहे. जून महिन्यामध्ये पेरणी झालेले मूग पीक कापणीच्या अवस्थेत असून, अपुरा पाऊस व पावसातील खंडामुळे शेंगांचे प्रमाण ५० ते ६० टक्के आहे. बाजरी पीकवाढीच्या व पोटरीच्या अवस्थेत आहे.

नगरमध्ये खरीप हंगामातील भात पिकाची अकोले तालुक्यामध्ये १७,३९१ क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे. सद्यःस्थितीत भातपीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत असून, पाऊस लांबल्यामुळे भातपीक सुकत आहे. खरीप ज्वारी पीकवाढीच्या अवस्थेत असून, पाऊस लांबल्यामुळे पिके सुकून जात आहेत. बाजरी पीक पोटरीच्या अवस्थेत असून, मका पीकवाढीच्या अवस्थेत आहे. तर, तूर पीकवाढीच्या अवस्थेत असून, सद्यःस्थितीत फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे. पाऊस नसल्यामुळे मूग पिकाच्या फुले व शेंगा गळण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन येण्याची शक्यता आहे.

उडीद पीकवाढीच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी पीक फुलोरा व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. पाऊस लांबल्यामुळे उडीद पीक सुकत आहे. भुईमूग पीक फुलोरा अवस्थेत असून, काही ठिकाणी पीक आऱ्या भरण्याच्या अवस्थेत आहे. भुईमूग पीक पावसाअभावी सुकू लागले आहे. सूर्यफूल पीक फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पीक फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पीक कळी धरण्याच्या अवस्थेत असून, जमिनीत ओलावा नसल्यामुळे फुलगळ दिसून येत आहे. कापूस पीक पाते लागण्याच्या अवस्थेत असून, जमिनीत ओलावा नसल्यामुळे पातेगळ होताना दिसत आहे. पाऊस लांबल्यामुळे कापसासह सर्वच पिके सुकत आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील मूग पीक फुलोरा अवस्थेत असून, पावसाअभावी पीक कोमेजलेल्या स्थितीत आहे. मूग पिकाचा फुलोरा व कळी गळून जात आहे. उडीद पीक फुलोरा अवस्थेत असून, पावसाअभावी पीक कोमेजलेल्या स्थितीत आहे. उडदाचा फुलोरा व कळी गळून जात आहे. सोयाबीन फुलोरा अवस्थेत असून, पावसाअभावी पीक कोमेजलेल्या स्थितीत आहे. पाऊस नसल्यामुळे मका कामेजलेल्या अवस्थेत आहे. बाजरी व तूर पिके पाऊस नसल्याने कोमेजलेल्या स्थितीत असून, पिकाच्या वाढीवर व फुटवे फुटण्यावर परिणाम झालेला आहे.

उत्पादकतेत मोठी घट येण्याची शक्यता

पावसातील खंडामुळे उत्पादकतेत मोठी घट येण्याची शक्यता आहे. पुणे विभागात सोयाबीन पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. मका पीकवाढीच्या अवस्थेत असून, पावसातील खंडामुळे पिकाची वाढ खुंटलेली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात पाऊस न आल्यास पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT