Kharif Crops : पुणे विभागात ९९ टक्के पेरण्या; १० लाख ५९ हजार हेक्टरवर पेरा

Kharif Crops Sowing : पश्चिम महाराष्ट्रात जुलैच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे पेरणीचा टक्का वाढला आहे. आतापर्यंत १० लाख ५९ हजार १५३ हेक्टर म्हणजेच ९९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
Kharif Crop Competition
Kharif Crop CompetitionAgrowon

Planting of Kharif Crop : जुलैच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे पेरणीचा टक्का वाढला आहे. पुणे विभागात आतापर्यंत सरासरी दहा लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी दहा लाख ५९ हजार १५३ हेक्टर म्हणजेच ९९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात पेरणी कमी असली, तरी सोलापूर, नगर जिल्ह्यांत पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परंतु आता पाऊस नसल्याने पिके सुकत असल्याचे चित्र आहे.

Kharif Crop Competition
Kharif Sowing : पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील खरीप पेरण्या खोळंबल्या

जूनमध्ये नगर जिल्ह्यात सरासरीच्या १०८.२ मिलिमीटरपैकी ५८.० मिलिमीटर म्हणजेच ५३ टक्के पाऊस पडला. पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७६.२ मिलिमीटरपैकी ९०.८ मिलिमीटर म्हणजेच ५१ टक्के, तर सोलापूरमध्ये सरासरीच्या १०२.५ मिलिमीटरपैकी २८.८ मिलिमीटर म्हणजेच २८ टक्के पाऊस पडला.

जुलैमध्ये नगरमध्ये सरासरीच्या ९७.५ मिलिमीटरपैकी १११.४ मिलिमीटर म्हणजेच ११४ टक्के, पुणे जिल्ह्यात सरासरीच्या ३०९.३ मिलिमीटरपैकी २८१.६ म्हणजेच ९१ टक्के, सोलापूरमध्ये सरासरीच्या ९४.८ मिलिमीटरपैकी १७९.७ मिलिमीटर म्हणजेच १८९ टक्के पाऊस पडला. ऑगस्टमध्ये पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने पावसाची फारशी नोंद झालेली नाही.

Kharif Crop Competition
Radhakrushna Vikhe Patil : दुबार पेरणीचं संकट; राज्य सरकारचं परिस्थितीवर लक्ष

यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसास सुरुवात झाली होती. तोपर्यंत पुणे विभागात दमदार हजेरी लावलेली नव्हती. त्यामुळे सर्वच ठिकाणी खरिपातील पेरण्या रखडल्याने पिके वाया जातात की काय, अशी धास्ती शेतकऱ्यांनी लागून राहिली होती. जूनच्या अखेरीस पावसास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

जुलैमध्ये पावसाने काही ठिकाणी दमदार हजेरी लावली. त्यामुळे भात लागवडीसह इतर पिकांच्या काही प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. सध्या नगरमध्ये हंगामातील भात पिकाची अकोले तालुक्यामध्ये १३ हजार ८६४ हे. क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे. बाजरी पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे. मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तूर पीक वाढीच्या अवस्थेत असून, सद्यःस्थितीत फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे.

मूग पीक शेंगा लागण्याच्या ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. उडीद पीक वाढीच्या अवस्थेत असून, काही भागात फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पीक फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत असून, पीक फुलोरा अवस्थेत आहे. कापूस पीक फांद्यांचे फुटवे व पाते लागण्याच्या अवस्थेत आहे.

Kharif Crop Competition
Koyna Dam: भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर ? कोयना, चांदोलीसह कोल्हापूरच्या धरणांची स्थिती अशी

पुणे जिल्ह्यामध्ये भात पिकाची ५३ हजार १७४ हेक्टर क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे. सद्यःस्थितीत भात लागवड अंतिम टप्प्यात आहे. बाजरी पीक वाढीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मका पिकाची पेरणी सुरू असून, सद्यःस्थितीत मका पीक उगवण व वाढीच्या अवस्थेत आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील मूग व उडीद पिके वाढीच्या अवस्थेत असून, पीक परिस्थिती सर्वसाधारण आहे. मका व सोयाबीन पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. बाजरी पीक फुटवे फुटणे व वाढीच्या अवस्थेत आहे. तूर पीक फांद्या फुटणे व वाढीच्या अवस्थेत आहे.

जिल्हानिहाय झालेली पेरणी, हेक्टरमध्ये

जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- पेरणीचे क्षेत्र --- टक्के

नगर --- ५,७९,७६८ -- ६,०२,७४५ -- १०४

पुणे --- १,९५, ७१० -- १,५१, १७३ --- ७७

सोलापूर --- २,८९,५७० -- ३,०५,२३५ -- १०५

एकूण --- १०,६५,०४८ -- १०,५९,१५३ --९९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com