Drought Condition : कोरडा दुष्काळ जाहीर करून खरीप पीकविमा लागू करा

Kharif Season 2023 : या वर्षी खरीप पेरणीसाठी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. पेरणीस उशीर होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी आहे. त्या पावसावर पेरण्या केल्या.
Drought Condition Maharashtra
Drought Condition MaharashtraAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : शासनाने मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी सरसकट ५० हजार रुपयांची मदत द्यावी. यासोबतच तत्काळ खरीप पीकविमा लागू करावा, अशी मागणी ॲग्रो व्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील यांनी केली आहे.

Drought Condition Maharashtra
Drought : दुष्काळसदृश परिस्थितीत पिकांचे जिल्ह्यात ५० टक्के सर्वेक्षण

विभागीय महसूल आयुक्त यांना श्री. मोरे यांनी बुधवारी (ता. २३) दिलेल्या एका निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले, की या वर्षी खरीप पेरणीसाठी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. पेरणीस उशीर होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी आहे. त्या पावसावर पेरण्या केल्या. त्यानंतरही पाऊस झाला नाही. पेरण्यासाठी केलेला खर्च वाया गेला.

Drought Condition Maharashtra
Drought in Maharashtra : दुष्काळाचं संकट दार ओलांडून घरात आलंय का?

त्यातच पुन्हा दुबार पेरणी करावी लागली. परंतु पावसाळा सुरू होऊन अडीच महिने होऊन गेले आहेत. पावसाळा संपण्याच्या वाटेवर आहे. तरीसुद्धा अपवाद वगळता मराठवाड्यात अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे खरिपातील जवळपास सर्वच ठिकाणी पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे.

अजूनही दमदार पावसाची शाश्‍वती दिसत नाही. शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. त्यासाठी शासनाने मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून खरीप पीकविमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तत्काळ जमा करावा.

सोबत हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, असे ॲग्रो व्हिजन गटशेती संघाचे संस्थापक प्रमुख संजय मोरे पाटील यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com