Water Crisis  Agrowon
ॲग्रो विशेष

Groundwater Level : विहिरी कोरड्या, भूजल पातळी घटल्याने शेतकऱ्यांचे हाल

Water Crisis : दरवर्षी धामणी धरणातील कालव्याचे पाणी सिंचनासाठी सोडले जात नसल्याने येथील विहिरी, तसेच बोअरवेलना पाणी कमी झाले आहे.

Team Agrowon

Palghar News : डहाणू तालुक्यातील कासा परिसरात सध्या पाणीटंचाई सदृश परिस्थिती झाली आहे. दरवर्षी धामणी धरणातील कालव्याचे पाणी सिंचनासाठी सोडले जात नसल्याने येथील विहिरी, तसेच बोअरवेलना पाणी कमी झाले आहे.

त्यामुळे नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. कासा भागात सूर्या नदी वाहत असून, त्यावर कासा गावांसाठी नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो, पण अजूनही अनेक नागरिकांनी नळयोजनेचे पाणी घेतले नाही.

त्यात यावर्षी कासा, भराड, तवा भागात जाणाऱ्या कालव्याची दुरुस्ती करण्यात येणार होते. त्या कालव्यात पाणी सोडले नसल्याने भूजल पातळी खोलवर गेल्याने विहिरी, तसेच बोअरवेलसाठी पाणीसमस्या जाणवत आहे.

पुढील तीन महिने त्रास सहन करावा लागेल, अशी भीती ग्रामस्थ विनोद गायकवाड यांनी व्यक्त केली.

कालव्याचे पाणी सोडले नसल्याने भूजल पातळी खाली गेल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. नळ योजनेचे पाणी मुबलक पुरवले जात आहे, पण अनेक कासा परिसरातील नागरिकांना पाणी समस्या जाणवत आहे. \
- सुनीता कांबडी, सरपंच, कासा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला ४ हजार ५०० रुपयांचा दर, धानाला ३ हजार ५०० हमीभाव, महिलांना दरमहा २ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन; अभिनेते विजय यांच्या पक्षाचा जाहीरनामा

Orchard Farmers Support: फळबाग उत्पादकांना आर्थिक आधार

Krishi Seva Kendra: सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Onion Storage Tips: कांदा साठवताना होणाऱ्या चुका टाळा, नुकसान वाचवा

Rural Roads Survey: ग्रामपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यांच्या सर्वेक्षणाचा निर्णय

SCROLL FOR NEXT