Pre-monsoon Farm Work: पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात परिस्थिती चिंताजनक बनली आहे. इंधन टंचाईचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून, ऐन मॉन्सूनपूर्व मशागतीची कामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. मागणीच्या तुलनेत केवळ ७० ते ८० टक्केच इंधन उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील अर्थचक्र मंदावण्याची चिन्हे दिसत आहेत..संपूर्ण जिल्ह्यात शहर व ग्रामीण भाग मिळून सुमारे ४५० ते ५०० पेट्रोल पंप कार्यरत आहेत. त्यापैकी ६० ते ७० पंप सोलापूर शहर व परिसरात असून, उर्वरित पंप ग्रामीण भागात आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. त्यातच इंधन दरातही वाढ झाली असून, पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०८ रुपये तर डिझेलचा दर ९५ रुपयांवर पोहोचला आहे..West Vidarbh Diesel: पश्चिम विदर्भात डिझेल टंचाईमुळे शेतीकामांना ‘ब्रेक’.पंपचालकांच्या मागणीच्या तुलनेत कंपन्यांकडून कमी इंधन पुरवठा होत असल्याचेही सांगितले जात आहे. सध्या मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू असून शेतकरी मॉन्सूनपूर्व मशागतीच्या कामांत व्यस्त आहेत. जमीन तयार करणे, नांगरट तसेच पेरणीपूर्व नियोजनासाठी ट्रॅक्टरसह विविध यंत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे..मात्र ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल संपल्याने ट्रॅक्टरचालक व शेतकऱ्यांना एका गावातून दुसऱ्या गावात इंधनासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी ‘डिझेल उपलब्ध नाही’ असे फलक झळकत आहेत, तर काही ठिकाणी मर्यादित प्रमाणातच इंधन मिळत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी परिस्थितीचा आढावा घेत शेती कामांसाठी पुरेसे इंधन उपलब्ध करून देण्याच्या सूचना पुरवठा विभागाला दिल्या आहेत..Diesel Shortage Issue: शेतकऱ्यांना तातडीने डिझेल उपलब्ध करून द्या: तुपकर.मी स्वतःच्या शेतीसह भाडेतत्त्वावर ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे करतो. पेट्रोलपंपावर ड्रममधून डिझेल देणे सध्या बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. माझ्या घरापासून पेट्रोलपंप ८ किलोमीटरवर आहे. तिथपर्यंत जाण्यातच ८०० रुपयांचे डिझेल खर्च होते. शिवाय डिझेल मिळेलच, याची खात्री नसते. शेतकऱ्यांचा विचार प्रशासनाने करायला हवा.महिंबर शेळके, शेतकरी, हराळवाडी, ता. मोहोळ.गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने डिझेलचे दर वाढत आहेत. आधीच डिझेलचा तुटवडा आहे. त्यात वाढत्या दरामुळे मशागतीची कामे करणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर शेतीची कामे ठप्प होतील.नाना जगताप, शेतकरी, सरकोली, ता. पंढरपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.