Groundwater Level  Agrowon
ॲग्रो विशेष

Groundwater Level : अमरावती जिल्ह्यात घटला भूजलाचा स्तर

Water Scarcity : जलस्तराचा घटता स्तर आणि प्रदूषित पाणी या गंभीर समस्या सध्या उभ्या ठाकल्या असून येणाऱ्या काही वर्षांत ही परिस्थिती अतिशय भीषण होणार आहे.

Team Agrowon

Amaravati News : जलस्तराचा घटता स्तर आणि प्रदूषित पाणी या गंभीर समस्या सध्या उभ्या ठाकल्या असून येणाऱ्या काही वर्षांत ही परिस्थिती अतिशय भीषण होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील १४ पैकी सात तालुक्यांमधील जलस्तर मागील पाच वर्षांच्या तुलनेने झपाट्याने घटला असून उर्वरित तालुक्यामध्ये जेमतेम जलस्तर टिकून आहे.

भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित यंत्रणेकडून ऑक्टोबर, जानेवारी, मार्च तसेच मे असे चार महिने जलस्तराची तपासणी ६३ वॉटरशेड्सच्या माध्यमातून १३९ विहिरींव्दारे करण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील ७ तालुक्यांमध्ये जलस्तर चिंतनीय स्थितीत घटलेला असून अन्य ठिकाणी किंचित वाढ दिसून येते.

जिल्ह्याचा विचार करता अमरावती, चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर, धामणगांवरेल्वे, चांदूररेल्वे, तिवसा तसेच धारणी या सात तालुक्यांतील जलस्तर मागील पाच वर्षाच्या तुलनेने यंदा घटलेला आहे. तर अचलपूर, अंजनगावसुर्जी, भातकुली, चांदूरबाजार, दर्यापूर, मोर्शी व वरुड या तालुक्यामध्ये जलस्तर किंचित वाढला किंवा कायम आहे, मात्र तो सुद्धा पुढील वर्षी घटण्याची शक्यता अधिक आहे. जिल्ह्यातील १३९ निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून संबंधित यंत्रणेकडून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

तालुकानिहाय घटलेला जलस्तर

तालुका स्तर (मीटरमध्ये)

धारणी २.१६,

चिखलदरा १.३५

नांदगाव खंडेश्वर १.३५

धामणगाव रे १.११

चांदूररेल्वे ०.९०

तिवसा ०.६५

अमरावती ०.३१

 जलस्तर घटण्याची कारणे

भूजल पुनर्भरण उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी नसणे, जमिनीचा पोत राखणाऱ्या नैसर्गिक जैविक फवारणीमुळे नष्ट होणे, भारतीय वृक्ष लागवडीचा अभाव, शेतीसाठी पाण्याचा अनावश्यक वापर, नदीकाठचे मूळ नैसर्गिक स्रोत नष्ट करणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Thailand-Cambodia War : आता थायलंड-कंबोडियात संघर्ष

Agriculture Warehouse : गोदाम पावती वित्तपुरवठा क्षेत्रासाठी सेवा पुरवठादार

Indian Agriculture Crisis : ...तरच भारताचा धाक निर्माण होईल

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी वळवला 

Ins-US Trade : डोनाल्ड ट्रम्प यांची दंडेलशाही

SCROLL FOR NEXT