Groundwater Level : परभणीच्या सहा तालुक्यांतील भूजल पातळीत घट

Water Crisis : विहिरी, विंधन विहिरीतून पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे. परिणामी, जिल्ह्यातील भूजल पातळी यंदाच्या जानेवारी महिन्यात ६.२७ मीटर खोल गेली आहे.
Groundwater Level
Groundwater Level Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : विहिरी, विंधन विहिरीतून पाण्याचा बेसुमार उपसा सुरू आहे. परिणामी, जिल्ह्यातील भूजल पातळी यंदाच्या जानेवारी महिन्यात ६.२७ मीटर खोल गेली आहे. भूजल सर्व्हक्षण व विकास यंत्रणेनेकडून घेण्यात आलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे.

सहा तालुक्यातील भूजल पातळीत सरासरीहून अधिक घट झाली आहे. २०२४ मधील ऑक्टोबरच्या तुलनेत भूजल पातळी सरासरी २.०७ मीटरने, तर पाच वर्षातील सरासरीच्या तुलनेत ०.४९ मीटरने खोल गेली आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गहिरे होऊ शकते.

Groundwater Level
Water Crisis : वसई-विरारमधील गावे पाण्यावाचून तहानलेली

भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भू वैज्ञानिक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ८६ निरीक्षण विहिरीतील भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात. जिल्ह्यात २०२४ च्या जून ते सप्टेंबर या (मॉन्सून कालावधी) चार महिन्यांत सरासरी ७६१.३ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतांना प्रत्यक्षात ८२७.३ मिलिमीटर (१०८.७ टक्के) पाऊस झाला.

सप्टेंबर महिन्यात २६७.९ मिलिमीटर (१५८.५ टक्के) पाऊस झाला. त्यामुळे भूगर्भात पाणी मुरण्याच्या प्रमाणात वाढ झाली. ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी ४.२० मीटर असल्याचे आढळून आले होते. सततच्या उपशामुळे यंदा अनेक भागांतील विहिरींचे पाणी जानेवारी महिन्यातच विहिरीचे तळ दिसू लागले.

Groundwater Level
Water Crisis : धाराशिवच्या चार प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित

जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीनुसार जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी ६.२७ मीटर खोल असल्याचे आढळून आले आहे. २०२० ते २०२४ या पाच वर्षातील सरासरी भूजल पातळीच्या तुलनेत यंदाच्या जानेवारी महिन्यात परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम या सहा तालुक्यांतील पातळी खोल गेली आहे. फेब्रुवारी महिन्यात तापमानात वाढ झाल्यामुळे पिकांना पाण्याची गरज वाढली. उपसा सुरूच असल्यामुळे भूजल पातळी खोल जात आहे.

परभणी जिल्हा भूजल पातळी स्थिती (मीटरमध्ये)

तालुका निरीक्षण विहिरी सरासरी भूजल पातळी जानेवारी भूजल पातळी फरक

परभणी १४ ६.१३ ६.९६ उणे ०.७२

जिंतूर २० ५.६५ ५.६२ अधिक ०.०३

सेलू १२ ८.२५ ७.२९ अधिक ०.९६

मानवत ४ ५.०७ ५.७० उणे ०.६३

पाथरी ८ ६.१७ ७.१८ उणे १.०१

सोनपेठ ५ ५.८० ७.६८ उणे १.८८

गंगाखेड ९ ६.८६ ७.७० उणे०.८४

पालम ७ ४.३८ ५.११ उणे ०.७३

पूर्णा ७ ३.७६ ३.३७ अधिक ०.४९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com